पिंपरी-चिंचवड
सेवकवर्ग सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बबन कांबळे
लोणावळा, ता. १६ : लोणावळा नगरपरिषद सेवकवर्ग सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बबन कांबळे व उपाध्यक्षपदी संतोष गिरी यांची बिनविरोध निवड झाली. माजी अध्यक्ष सुभाष बलकवडे व माजी उपाध्यक्ष चेतन सारवान यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सहायक निबंधक सहकारी संस्था वडगाव मावळ येथे निवडणूक झाली. सहकारी अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. संस्थेचे व्यवस्थापक दशरथ गावकर यांनी सहकार्य केले. सचिव जितेंद राऊत, खजिनदार अनिल अकोलकर, माजी अध्यक्ष सुभाष बलकवडे, चेतन सारवान, संचालक सूर्यकांत हाळुंदे, मुरलीधर कांबळे, खंडू बोभाटे, स्वाती गायकवाड, जयश्री राणवे, सुनील दहिभाते, अंकुश खिल्लारे, अरुण मातेरे, अनंता टेमघरे यावेळी उपस्थित होते.
फोटो ः 2750, 2751