अक्षय तृतीया निमित्ताने मोशीतील श्री नागेश्वर उपबाजार समिती मध्ये दोन दिवसात सुमारे 10 टन विविध जातींच्या आंब्यांची आवक... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षय तृतीया निमित्ताने मोशीतील श्री नागेश्वर उपबाजार समिती मध्ये दोन दिवसात सुमारे 10 टन विविध जातींच्या आंब्यांची आवक...
अक्षय तृतीया निमित्ताने मोशीतील श्री नागेश्वर उपबाजार समिती मध्ये दोन दिवसात सुमारे 10 टन विविध जातींच्या आंब्यांची आवक...

अक्षय तृतीया निमित्ताने मोशीतील श्री नागेश्वर उपबाजार समिती मध्ये दोन दिवसात सुमारे 10 टन विविध जातींच्या आंब्यांची आवक...

sakal_logo
By

दोन दिवसात दहा टन विविध
जातींच्या आंब्यांची आवक

मोशी, ता. ३ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असलेल्या मंगळवारी (ता. ३) अक्षय तृतीया निमित्ताने मोशीतील श्री नागेश्वर उपबाजार समिती मध्ये सोमवारी व मंगळवारी (ता. २ व ३) दोन दिवसांत रत्नागिरी, देवगड, कर्नाटक हापूस, केशर, बदाम, पायरी आदी आंब्याची सुमारे १० ते १२ टन आवक झाली. निमित्ताने मोशीतील श्री नागेश्वर उपबाजार समितीमध्ये आंबे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
रत्नागिरी व देवगड हापूस आंब्यांच्या सात डझनाच्या पेटीला चार ते पाच हजार, सहा डझनाच्या पेटीला तीन ते चार हजार तर पाच डझनाच्या पेटीला दोन हजार ५०० ते तीन हजार रुपये घाऊक बाजारभाव होता. किरकोळ रत्नागिरी व देवगड आंब्याच्या एक डझनला ७०० रुपये ८०० भाव होता.

रस्त्यावरील काही विक्रेते रत्नागिरी हापूस म्हणून कर्नाटक आंबा हापूस म्हणून विकतात. नागरिकांनी त्यापासून सावध राहत रस्त्यावरील आंबे न घेता नैसर्गिक पद्धतीने पिकवून घाऊक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे आंबे घ्यावेत. रंगाने पूर्ण नारंगी, आकाराने सारखे, आतून केशरी, कातडी पातळ व चवीला गोड, अशी अस्सल रत्नागिरी हापूसची ओळख आहे.
- संतोष सोनवणे, तुळजाभवानी फ्रूट्स, आंबा घाऊक विक्रेते.

मोशी : येथील फळबाजारात आंबे खरेदीसाठी नागरिकांनी केलेली गर्दी.

Web Title: Todays Latest Marathi News Mos22b00693 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top