प्राधिकरणाच्या मालमत्तांना महापालिकेचे नियम लावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राधिकरणाच्या मालमत्तांना महापालिकेचे नियम लावा
प्राधिकरणाच्या मालमत्तांना महापालिकेचे नियम लावा

प्राधिकरणाच्या मालमत्तांना महापालिकेचे नियम लावा

sakal_logo
By

मोशी, ता. ११ : पिंपरी चिंचवड-प्राधिकरण बरखास्तीनंतर महापालिकेत मालमत्ता वर्ग झाल्या आहेत. मात्र, किचकट असलेली संपूर्ण प्रक्रिया महापालिका प्रशासकांनी सुलभ करावी, अशी मागणी चिखली-मोशी पिंपरी चिंचवड शहर हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या बैठकीत केली. यावेळी प्राधिकरणातील सोसायटी धारक, सदनिकाधारक, बंगलोधारक आणि फेडरेशन प्रतिनिधी उपस्थित होते.

शासन निर्णयानुसार प्राधिकरणातील सर्व विकसित मालमत्ता महापालिकेत वर्ग केल्या आहेत. परंतु प्राधिकरणाचे पूर्वीचे मालमत्ता हस्तांतरण करतानाचे नियम, हस्तांतरण शुल्क, प्रशासकीय जे नियम होते तेच सर्व नियम कायम ठेवले आहेत. ती सर्व प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे सध्या महापालिकेत असणारेच नियम या मालमत्तांना लागू करावेत. यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, असे बैठकीत ठरल्याची माहिती अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mos22b00699 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top