मोशीतील बांधकाम व पत्राशेडवर कारवाई बोराटे वस्ती ते बनकर वस्तीलगतच्या अतिक्रमणांवर शनिवारी हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोशीतील  बांधकाम व पत्राशेडवर कारवाई 

बोराटे वस्ती ते बनकर वस्तीलगतच्या अतिक्रमणांवर शनिवारी हातोडा
मोशीतील बांधकाम व पत्राशेडवर कारवाई बोराटे वस्ती ते बनकर वस्तीलगतच्या अतिक्रमणांवर शनिवारी हातोडा

मोशीतील बांधकाम व पत्राशेडवर कारवाई बोराटे वस्ती ते बनकर वस्तीलगतच्या अतिक्रमणांवर शनिवारी हातोडा

sakal_logo
By

मोशी, ता. १४ : येथील पुणे-नाशिक महामार्गावरील बोराटे वस्ती ते बनकर वस्ती येथील ६१ मीटर रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या बांधकाम व पत्राशेडवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने शनिवारी (ता. १४) कारवाई केली.

महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने सकाळी बोराटे वस्तीलगतच्या बांधकामे पाडण्यास जेसीबीच्या साहाय्याने सुरुवात केली. यावेळी दक्षता म्हणून स्थानिक पोलिस, राज्य राखीव दल तसेच महापालिकेचे काही अधिकारी, अग्निशमन बंब, पोलिस व्हॅन आदी ताफा उपस्थित होता.
येथील बाधित बांधकाम व पत्राशेड मालकांना अगोदरच ती काढून घेण्याविषयी नोटिसा मिळाल्या होत्या. त्यामुळे येथील बहुतांश नागरिकांनी मागील आठवड्यापासूनच आपापली बांधकामे व पत्राशेड काढून घेतली होती. मात्र, ज्या नागरिकांनी आजपर्यंत ती काढून घेतली नव्हती ती बांधकामे व पत्राशेड आज महापालिकेच्या वतीने काढण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.

काम सुरू करून मगच कारवाई करा
जोपर्यंत पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत या महामार्गावरील बांधकामांवर कारवाई करू नये, असे भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांनी स्वतंत्रपणे तर त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देत मागणी केली होती.

फोटो ओळी : पुणे नाशिक महामार्ग, बनकर वस्ती, मोशी : येथील रस्तारुंदीकरणात बाधित ठरत असलेल्या बांधकामांवर करण्यात आलेली कारवाई.

Web Title: Todays Latest Marathi News Mos22b00703 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top