भरघोस शेती उत्पन्नासाठी ‘ॲग्रोवन’ नियमित वाचावा नीलेश लोखंडे यांचे आवाहन, खरीप बक्षीस योजनेचे प्रमोशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरघोस शेती उत्पन्नासाठी
‘ॲग्रोवन’ नियमित वाचावा
नीलेश लोखंडे यांचे आवाहन, खरीप बक्षीस योजनेचे प्रमोशन
भरघोस शेती उत्पन्नासाठी ‘ॲग्रोवन’ नियमित वाचावा नीलेश लोखंडे यांचे आवाहन, खरीप बक्षीस योजनेचे प्रमोशन

भरघोस शेती उत्पन्नासाठी ‘ॲग्रोवन’ नियमित वाचावा नीलेश लोखंडे यांचे आवाहन, खरीप बक्षीस योजनेचे प्रमोशन

sakal_logo
By

मोशी, ता. १६ ः शास्त्रीय पद्धतीने शेती करत भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवाने दै. ॲग्रोवन हा अंक हा नियमित वाचणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन श्री नागेश्वर महाराज कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे प्रमुख नीलेश लोखंडे यांनी केले. ॲग्रोवन समृद्ध खरीप बक्षीस योजनेचे लोखंडे यांच्या हस्ते प्रमोशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रामदास सावंत, रफिक मुलानी, दीपक शिंदे, बाजार समिती अधिकारी गणेश सस्ते, आडते असोशियन अध्यक्ष रामदास काळजे, सेक्रेटरी उत्तम कटके, शहाजी जगताप, दिनेश आल्हाट विशाल बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
लोखंडे पुढे म्हणाले, ‘‘ॲग्रोवनमध्ये शेतीविषयक अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळते तर सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या बाजारभावामधून शेती मालाचे भाव समजतात. या शेतीविषयक बातम्या वाचूनच महाराष्ट्रातील शेतकरी या उपबाजार समितीमध्ये कलिंगड, खरबूज, अननस, शहाळे, कोकणमधून वेगवेगळ्या प्रकारचे आंबे या प्रकारची शेकडो क्विंटल फळांची आवक होते तर महाराष्ट्राच्या विविध भागातून शेतमालाची आवक होते. या ठिकाणी मालाला चांगला भाव मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपला शेतमाल या ठिकाणी विक्रीसाठी आणत आहेत. स्वच्छ व नीटनेटका उपबाजार समितीचा आवार ही बाब लक्षात घेता, नागरिकही या ठिकाणी भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी करत असतात.
दै. ‘सकाळ’चे संदीप वाघ यांनी स्वागत केले. परशुराम सैद यांनी आभार मानले. आदिनाथ कुचेकर, दीपक महाडीक यांचेही सहकार्य लाभले.

फोटो : मोशी उपबाजार, मोशी : दै. ॲग्रोवन या अंकाचे वितरण करण्यात आले.
फोटो ः 01540

Web Title: Todays Latest Marathi News Mos22b00726 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top