मोशी परिसरात मुसळधार पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोशी परिसरात मुसळधार पाऊस
मोशी परिसरात मुसळधार पाऊस

मोशी परिसरात मुसळधार पाऊस

sakal_logo
By

मोशी, ता. २२ ः दुपारी १ ते २ दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने मोशी, पुणे नाशिक महामार्ग तसेच मोशी प्राधिकरण परिसरातील नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली, तर परिसरातील महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना झाडांचा आश्रय घ्यावा लागला. महामार्गासह अंतर्गत रस्ते जलमय झाले होते.

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान झाल्यानंतर दुपारी मुसळधार पावसाला सुरवात झाली. सकाळपासूनच हवेमध्ये प्रचंड उकाडा जाणवत होता. पुणे- नाशिक महामार्ग, बोराटे वस्ती, लिंक रस्ता, स्पाईन रस्ता आदी भागांतील रस्त्यांवरील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.
-------------------------
मोशी : दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने नाशिक महामार्गावर वाहनचालकांना कसरत करावी लागली.

Web Title: Todays Latest Marathi News Mos22b00731 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top