चऱ्होलीत वीज तारांना फांद्याचा स्पर्श नागरिकांच्या जिवाला धोका, छाटणी करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चऱ्होलीत वीज तारांना फांद्याचा स्पर्श 
नागरिकांच्या जिवाला धोका, छाटणी करण्याची मागणी
चऱ्होलीत वीज तारांना फांद्याचा स्पर्श नागरिकांच्या जिवाला धोका, छाटणी करण्याची मागणी

चऱ्होलीत वीज तारांना फांद्याचा स्पर्श नागरिकांच्या जिवाला धोका, छाटणी करण्याची मागणी

sakal_logo
By

मोशी, ता. २० : चऱ्होली येथील विविध रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्यांच्या फांद्या रस्त्यालगत असलेल्या विजेच्या तारांना स्पर्श करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या जिवाला धोका उत्पन्न झाला असून, फांद्याची छाटणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने सध्या चऱ्होलीचा विकास करण्यात येत आहे. यामध्ये प्रशस्त रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा तीन मीटरचे पदपथ, मध्यभागी रस्ता दुभाजक आणि या पदपथाच्या कडेला आणि रस्ता दुभाजकाच्या मध्यभागी विजेचे खांबही लावण्यात आलेले आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी या रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपणही करण्यात आले होते. तसेच काही ठिकाणी अगोदरपासूनच झाडे होती. या सर्व झाडांच्या वाढलेल्या फांद्या सध्या रस्त्याच्या मध्यभागी रस्त्यालगत येत आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत तारांनाही या झाडांचा स्पर्श होत आहे. तारांना होणाऱ्या झाडांच्या फांद्यांच्या स्पर्शामुळे नागरिकांच्या जिवाला धोका उत्पन्न झाला आहे. तसेच या रस्त्याने ये- जा करणाऱ्या वाहन चालकांनाही वाढलेल्या फांद्यांचा त्रास होत आहे. त्यामुळे या परिसरातील वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याची मागणी स्थानिक नागरिक सदाशिव निकम, अभिजित तिकोणे, नवनाथ पठारे, अनिल तापकीर यांनी केले आहे.

फोटो ओळी :
01643, 01644