मोशी, डुडुळगाव, चऱ्होली मध्ये विद्युत रोषणाईच्या देखाव्यांवर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोशी, डुडुळगाव, चऱ्होली मध्ये 
विद्युत रोषणाईच्या देखाव्यांवर भर
मोशी, डुडुळगाव, चऱ्होली मध्ये विद्युत रोषणाईच्या देखाव्यांवर भर

मोशी, डुडुळगाव, चऱ्होली मध्ये विद्युत रोषणाईच्या देखाव्यांवर भर

sakal_logo
By

मोशी, ता. ५ : मोशी, मोशी प्राधिकरण, डुडुळगाव, चऱ्होली येथे आकर्षक फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईवर भर असलेले देखावे पहावयास मिळत आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या आषाढी वारीच्या निमित्ताने आयोजित वारी विठुरायाची यांसह अनेक ठिकाणी संतांच्या प्रतिमांचे दर्शन घडत आहेत. तर काही मंडळांनी आपल्या भव्य अशा गणेश मूर्तीची स्थापना करत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, पर्यावरण विषयक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे पहावयास मिळत आहे.

मोशी : मोशी-देहू रस्त्यावरील बारणे वस्ती येथील शिवशंभो प्रतिष्ठान या मंडळांनी सोन्या चांदीचे दागिने घातलेल्या आकर्षक व भव्य मूर्तीची स्थापना करून नैसर्गिक फुलांसह आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. श्री सावता माळी तरुण मित्र मंडळ, उत्तर लक्ष्मीनगर मोशी या मंडळाने भव्य मूर्तीची स्थापना करत आकर्षक सजावट केली आहे. शिवतेज मित्र मंडळ आमराई, मोशी या मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई करत राजमहाल उभारला आहे. अमरवीर ज्योती तरुण मंडळ, श्री नागेश्वर महाराज चौक, मोशी गावठाण, या मंडळाने भव्य श्रींची मूर्ती उभारत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संगम मित्र मंडळ, संगम चौक, मोशी गावठाण या मंडळांनीही भव्य श्रींची मूर्ती स्थापन करून आकर्षकपणे विद्युत रोषणाईची सजावट केली आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिवप्रताप मित्र मंडळ मधली आळी, मोशी गावठाण, या मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई करत सजावट केली. बोराटे तालीम मंडळ आणि साईनाथ मित्र मंडळ बोराटे आळी, मोशी गावठाण, या मंडळांनी एकत्र येऊन आकर्षक सजावट करून भव्य मूर्तीची स्थापना केली आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नवचैतन्य मित्र मंडळ नवचैतन्यनगर आल्हाट वस्ती, मोशी या मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
मोशीतील श्री नागेश्वरनगर मधील श्री नागेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने भव्य विठूरायाची मूर्ती उभारली असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्री संत सावता माळी विकास प्रतिष्ठान देहू रस्ता बोराटेवस्ती, मोशी, या मंडळाने भव्य गणेश मूर्तीची स्थापना करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जय भारत प्रतिष्ठान मित्रमंडळ बोराटे आळी, देहू रस्ता या मंडळाने भव्य अशा नरसिंह अवतारातील मूर्तीची स्थापना केली असून आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. त्याबरोबरच येणाऱ्या प्रत्येक भाविकांना विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे वाटप केले आहे. छत्रपती स्पोर्ट्स असोसिएशन बोऱ्हाडेवाडी, मोशी या मंडळाने रंगीत कपडे आणि फुले यांपासून आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई केली आहे.

मोशी प्राधिकरण : संतनगर मित्र मंडळ सेक्टर नंबर ४, मोशी प्राधिकरण या मंडळाने पर्यावरण पूरक नैसर्गिक फुलांची केलेली सजावट. त्याबरोबरच विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आमराई चॅरिटेबल ट्रस्ट सेक्टर नंबर चार, मोशी प्राधिकरण, या मंडळाने विविध दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई करत जादूचे प्रयोग, व्याख्याने, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

डुडुळगाव : श्री संत सावता माळी तरुण मित्र मंडळ, साईनाथ चौक तळेकर नगर, डुडुळगाव, या मंडळाने उभारलेला भव्य राजमहालाचा देखावा उभारला आहे.
नवनाथांपैकी एक असलेले श्री अडबंगनाथ महाराजांची समाधी डुडुळगाव येथे आहे. त्या ठिकणच्या श्री अडबंगनाथ मित्र मंडळाने भव्य मूर्तीची स्थापना करून आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणेश प्रतिष्ठान वहिले नगर, डुडुळगाव या मंडळाने आकर्षक फुलांची सजावट केली आहे.

चऱ्होली : गवळीबुवा तरुण मंडळ, चोविसावाडी गावठाण, चऱ्होली. या मंडळाने भव्य मूर्तीची स्थापना केली असून आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. याबरोबरच विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवतेज मित्र मंडळ, चोविसावाडी, चऱ्होली. या मंडळाने आकर्षक फुलांची
सजावट करत जादूच्या प्रयोगाबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
श्री दत्त तरुण मंडळ दाभाडे सरकार चौक, श्री वाघेश्वर मित्र मंडळ वाघेश्वरवाडी, चऱ्होली येथील मंडळांनी भव्य मूर्तीची स्थापना करून आकर्षक फुलांची आणि विद्युत सजावट केली आहे.

फोटो : छायाचित्रकार संतोष हांडे यांनी डेस्कवर टाकले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mos22b00770 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..