कोथिंबिर, मेथीने खाल्ला पुन्हा भाव मोशी उपबाजार समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोथिंबिर, मेथीने खाल्ला पुन्हा भाव

मोशी उपबाजार समिती
कोथिंबिर, मेथीने खाल्ला पुन्हा भाव मोशी उपबाजार समिती

कोथिंबिर, मेथीने खाल्ला पुन्हा भाव मोशी उपबाजार समिती

sakal_logo
By

मोशी, ता. १८ : जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सध्या परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे. त्यामुळे मोशीतील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये पालेभाज्यांची मागील आठवड्यापेक्षा १० ते २० टक्क्यांनी आवक कमी म्हणजेच फक्त २७ हजार २७० जुड्यांची झाली.
त्यामुळे कोथिंबिरीचे आणि मेथीचे भाव १० ते १२ रुपयांवरून २२ ते २५ रुपयांवर पोचले आहेत. उपबाजारात रविवारी (ता. १८) कोथिंबीर १२ हजार ६७०, मेथी ३ हजार ५००, शेपू ३ हजार, कांदापात २ हजार ३५०, पालक २ हजार ६५० अशी एकूण २७ हजार २७० जुड्या पालेभाज्यांची समितीमध्ये आवक झाली. फळे आणि फळेभाज्यांची आवक स्थिर आहे. त्यामुळे त्यांचे भावही स्थिर आहेत.

शेती माल आवक :
* फळ भाज्या एकूण आवक : २ हजार ८६८ क्विंटल

* बाजार भाव एक किलोचे (रुपयांमध्ये)

कांदा : गोल्टा : २० ते २२, चांगला : २२ ते २५, बटाटा : २५ ते २८, आले : ७० ते ८०, भेंडी : ६० ते ७०, गवार : ८५ ते ९०, टोमॅटो : १५ ते २०, मटार : ४० ते ५०, घेवडा : ६० ते ७० , दोडका : ६० ते ७०, घोसाळे : ५० ते ६०,
मिरची काळी लवंगी : ७० ते ८०, ज्वाला : ६० ते ७०, मोठी लांब मिरची : ५० ते ६०, ढोबळी : ७० ते ८०,
भोपळा : दुधी : ३० ते ४०
लाल : २५ ते ३०, भुईमूग : ७० ते ७५, काकडी :
३० ते ४०, कारली : ६० ते ७०, गाजर : ४५ ते ५०, पापडी : ५५ ते ६०, पडवळ : ५५ ते ६०, फ्लाॅवर : ५० ते ५५, कोबी : ५० ते ५५, वांगी : ५० ते ५५, सुरण : ५० ते ६०, तोंडली जाड : ३० ते ४०, तोंडली लहान : ४० ते ४५, बीट : ४० ते ४५, कोहळा : ४० ते ४५, पावटा : ५० ते ६०, वाल : ५० ते ६०, वालवर : ४५ ते ५०, शेवगा : ४० ते ६०, चवळी : ४० ते ४५, मका कणीस : १० ते १२, लिंबू : ६० ते ७०.
पालेभाज्या एकूण आवक : २७ हजार ७७० जुड्या

बाजार भाव एका जुडीचा
(रुपयांमध्ये)
कोथिंबीर : २२ ते २५, मेथी : २२ ते २५, शेपू : १५ ते १८, कांदा पात : १५ ते १८, पालक : १५ ते १८, मुळा : १० ते १२, चवळी : १० ते १२, करडई : १० ते १२, राजगिरा : १० ते १२, चाकवत : ८ ते १०, अंबाडी : १० ते १५.

फळे एकूण आवक : ६८ क्विंटल,
बाजार भाव एका किलोचे
(रुपयांमध्ये)
सफरचंद : परदेशी : २१० ते २२०, रॉयल : १८० ते १९०, काश्मीर : १६० ते १७०, पिअर : ६० ते ७०, किवी : १०० बाॅक्स, मोसंबी : १८० ते २००, संत्री परदेशी : २०० ते २२० महाराष्ट्र : १८० ते १९०, डाळिंब : १८० ते २००, पेरू : ९० ते १००, अंजीर : १०० ते १२०, पपई : ३० ते ४०, कलिंगड : २०, चिकू : ५० ते ५५, सीताफळ : ७० ते ८०, केळी : ३० ते ३५, सोनकेळी : ९० ते १००, आलुबुकार : १८० ते १९०, शहाळे : २५ ते ३५, अननस : ४० ते ५०, आवळा : ५० ते ६०, ड्रॅगन फ्रूट : १४० ते १५० रुपये.

फोटो ः ०१६८४, ०१६८५, ०१६८६

Web Title: Todays Latest Marathi News Mos22b00778 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..