वर्ल्ड किक बॉक्सिंगसाठी शहरातील दोघांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्ल्ड किक बॉक्सिंगसाठी 
शहरातील दोघांची निवड
वर्ल्ड किक बॉक्सिंगसाठी शहरातील दोघांची निवड

वर्ल्ड किक बॉक्सिंगसाठी शहरातील दोघांची निवड

sakal_logo
By

मोशी, ता. २३ : इटली येथे होणाऱ्या वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी पिंपरी-चिंचवडचे दोन विद्यार्थी कियांश डाकलिया आणि अमीन शेख यांची भारतीय संघात निवड झाली आहे.

कियांश डाकलिया याची ३२ किलो तर अमीन शेख ३६ किलो वजन गटामधून १ ते ९ ऑक्टोबर रोजी व्हेनिस, इटली येथे होणाऱ्या ‘वाको चिल्ड्रन कॅडेट आणि ज्युनिअर किक बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२२’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय संघात निवड झालेली आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातून स्पर्धक सहभागी होणार आहे. वाको वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात देशभरातून निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कियांश व अमीन हे भारतीय संघामधील सर्वात लहान खेळाडू आहे, अशी माहिती भारतीय संघाचे कोच व महाराष्ट्र किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश शेलार यांनी दिली.
अमीन व कियांश यांनी नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश मिळविले असून हा पिंपरी-चिंचवडमध्ये रुद्र मार्शल आर्ट्स क्लब मधील शुभम कानडे अध्यक्ष किक बॅाक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन पिंपरी-चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासह महाराष्ट्रभरातून दोन्ही खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मोशी : इटली येथे होणाऱ्या वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील कियांश डाकलिया आणि अमीन शेख यांची भारतीय संघात निवड झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mos22b00779 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..