मटार, गवारचे भाव वधारले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मटार, गवारचे भाव वधारले
मटार, गवारचे भाव वधारले

मटार, गवारचे भाव वधारले

sakal_logo
By

मोशी, ता. ९ : येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये फळभाज्या, पालेभाज्या आणि फळांची आवक रविवारी स्थिर राहिली. मात्र,
पितृ पंधरवडा संपल्याने फळभाज्या, पालेभाज्या व फळांचे दर १० टक्क्यांनी कमी झाले आहेत.
या उपबाजारात कांदा, बटाटा, लसुण, टोमॅटो, वांगी आदी फळभाज्यांची आवक २ हजार ७४६ क्विंटल, कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात, पालक आदी पालेभाज्यांची आवक ३५ हजार २०० क्विंटल तर सफरचंद, संत्री, मोसंबी, केळी, पपई आदी फळांची आवक ३३४ क्विंटल इतकी झाली.

बाजार भाव एक किलोचे (रुपयांमध्ये)
कांदा - गोल्टा : १५ ते १८, चांगला : २० ते २२, बटाटा : २० ते २२, आले : ३५ ते ४५, भेंडी : ५० ते ६०, गवार : ७८ ते ९०, टोमॅटो : १५ ते २०, मटार : १०० ते १३०, घेवडा : ५० ते ६० , दोडका : ५० ते ६०, घोसाळे : ५० ते ६०, मिरची काळी लवंगी : ७० ते ८०, ज्वाला : ६० ते ७०, मोठी लांब मिरची : ५० ते ६०, ढोबळी : ६० ते ७०, भोपळा : दुधी : ३० ते ४० लाल भोपळा : २५ ते ३०, भुईमूग : ७० ते ७५, काकडी : ३० ते ४०, कारली : ५० ते ६९, गाजर : ४५ ते ५०, पापडी : ५५ ते ६०, पडवळ : ५५ ते ६०, फ्लाॅवर : ३० ते ४०, कोबी : ३० ते ४०, वांगी : ४० ते ५०, सुरण : ४० ते ५०, तोंडली जाड : ३० ते ४०, तोंडली लहान : ४० ते ४५, बीट : ४० ते ४५, कोहळा : ४० ते ४५, पावटा : ५० ते ६०, वाल : ५० ते ६०, वालवर : ४५ ते ५०, शेवगा : ४० ते ६०, चवळी : ४० ते ४५, मका कणीस : १० ते १२, लिंबू : ६० ते ७०

बाजार भाव एका जुडीचा (रुपयांमध्ये)
कोथिंबीर : १० ते १५, मेथी : १० ते १५, शेपू : १० ते १२, कांदा पात : १० ते १२, पालक : १० ते १२, मुळा : ८ ते १०, चवळी : १० ते १२, करडई : १० ते १२, राजगिरा : १० ते १२, चाकवत : ८ ते १०, अंबाडी : १० ते १५

बाजार भाव एका किलोचे (रुपयांमध्ये)
सफरचंद - परदेशी : १५० ते १६०, रॉयल : १४० ते १५०, काश्मीर : १६० ते १७०, पिअर : ५० ते ६०, किवी : १०० बॉक्स, मोसंबी : ११० ते १२०, संत्री - परदेशी : ११० ते १२०, महाराष्ट्र : ८० ते ९०, डाळींब : १५० ते १६०, पेरू : ६० ते ७०, अंजीर : ७० ते ८०, पपई : २५ ते ३०, कलिंगड : २०, चिकू : ५० ते ५५, सीताफळ : ६० ते ७०, केळी : ३० ते ३५, सोनकेळी : ९० ते १००, आलुबुखार : १५९ ते १६०, शहाळे : २५ ते ३५, अननस : ४० ते ५०, आवळा : ५० ते ६०, ड्रॅगन फ्रुट : १४० ते १५० रु.