मोशीत कोथिंबीरीची मोठी आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोशीत कोथिंबीरीची मोठी आवक
मोशीत कोथिंबीरीची मोठी आवक

मोशीत कोथिंबीरीची मोठी आवक

sakal_logo
By

मोशी, ता. ६ : श्री नागेश्वर महाराज उपबाजार रविवारी (ता. ६) कोथिंबीर २० हजार ७५९, मेथी आठ हजार १००, शेपू एक हजार ७००, कांदापात एक हजार आदी पालेभाज्यांची एकूण आवक ४१ हजार ५०० जुड्यांची मागील आठवड्यापेक्षा १५ टक्क्यांनी अधिक मोठी आवक झाली. त्यामुळे पालेभाज्यांच्या किमतीत १५ टक्यांनी घट झाली तर शेवगा, मटार, बीन्स, कांदा, बटाटा, लसूण, आले, मिरच्या, टोमॅटो, वांगी आदी फळभाज्यांची आवक दोन हजार २५० क्विंटल तर सफरचंद, संत्री, मोसंबी, केळी, पपई आदी फळांची आवक २०५ क्विंटल इतकी झाली आहे. फळे व फळभाज्यांची आवक स्थिर असल्याने त्यांचे भावही स्थिर होते.


शेती माल आवक :
* फळ भाज्या एकूण आवक : २ हजार २९५ क्विंटल
* बाजार भाव एक किलोचे (रुपयांमध्ये)
कांदा :
गोल्टा : २० ते २२, चांगला : २२ ते २५, बटाटा : २२ ते २५, आले : ३४ ते ४५, भेंडी : ४० ते ५०, गवार : ७० ते ८०, टोमॅटो : ४० ते ५०, मटार : १३० ते १४०, घेवडा : ५० ते ७० , दोडका : ५० ते ६०, घोसाळे : ५० ते ६०, मिरची काळी लवंगी : ७० ते ८०, ज्वाला : ६० ते ७०, मोठी लांब मिरची : ५० ते ६०, ढोबळी : ६० ते ७०, भोपळा : दुधी : ३० ते ४०, लाल : २५ ते ३०, भुईमूग : ७० ते ७५, काकडी : ३० ते ४०, कारली : ५० ते ६९, गाजर : ४५ ते ५०, पापडी : ५० ते ५५, पडवळ : ५० ते ६०, फ्लाॅवर : ३० ते ४०, कोबी : ३० ते ४०, वांगी : ४५ ते ५०, सुरण : ४० ते ५०, तोंडली जाड : ३० ते ४०, तोंडली लहान : ४० ते ४५, बीट : ४० ते ४५, कोहळा : ४० ते ४५, पावटा : ५० ते ६०, वाल : ५० ते ६०, वालवर : ४५ ते ५०, शेवगा : ८० ते १००, चवळी : ४० ते ४५, मका कणीस : १० ते १२, लिंबू : ६० ते ७०.

* पालेभाज्या एकूण आवक : ४१ हजार ५०० जुड्या
बाजार भाव एका जुडीचा (रुपयांमध्ये) कोथिंबीर : ५ ते १५, मेथी : १० ते १२, शेपू : ७ ते ८, कांदा पात : ७ ते ८, पालक : ५ ते १०, मुळा : ८ ते १०, चवळी : ८ ते १०, करडई : ८ ते १०, राजगिरा : १० ते १२, चाकवत : ८ ते १०, अंबाडी : १० ते १५.

फळे एकूण आवक : २०५ क्विंटल बाजार भाव एका किलोचे (रुपयांमध्ये)ः सफरचंद : परदेशी : १४० ते १५०, रॉयल : १२० ते १३०, काश्मीर : १४० ते १५०, पिअर : ५० ते ६०, किवी : १०० बॉक्स, मोसंबी : ८० ते ९०, संत्री परदेशी : ९० ते १०० महाराष्ट्र : ८० ते ९०, डाळिंब : १२० ते १३०, पेरू : ६० ते ७०, अंजीर : ७० ते ८०, पपई : २५ ते ३०, कलिंगड : २०, चिकू : ५० ते ५५, सीताफळ : ६० ते ७०, केळी : ३० ते ३५, सोनकेळी : ९० ते १००, आलुबुकार : १५० ते १६०, शहाळे : २५ ते ३५, अननस : ४० ते ५०, आवळा : ५० ते ६०, ड्रॅगन फ्रूट : १४० ते १५० रु.