मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री सत्तार यांचा राजीनामा घ्यावा : ॲड. तापकीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री सत्तार यांचा राजीनामा घ्यावा : ॲड. तापकीर
मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री सत्तार यांचा राजीनामा घ्यावा : ॲड. तापकीर

मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री सत्तार यांचा राजीनामा घ्यावा : ॲड. तापकीर

sakal_logo
By

आळंदी : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संसदपटू खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत अपशब्द वापरून समाजाच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी ई-मेलद्वारे केली आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या शिवराळ भाषेमुळे जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. सत्तार यांचा राजीनामा न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा ॲड. तापकीर यांनी दिला आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा च-होली बुद्रूक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांनी जाहीर निषेध व्यक्त करून संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, प्रा.संदीप तापकीर, प्रदीप आबा तापकीर, ॲड. मयूर तापकीर, ज्योती तापकीर, नरेंद्र तापकीर, दत्तात्रय बुर्डे, अनिल तापकीर आदी उपस्थित होते. भविष्यात अब्दुल सत्तार यांनी बेताल वक्तव्य केल्यास त्यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही असा खणखणीत इशारा ॲड. तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिला आहे.