माफी नको राजीनामा द्या ‘राष्ट्रवादी’ची अब्दुल सत्तार यांच्याबाबत राज्यपालांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माफी नको राजीनामा द्या 
‘राष्ट्रवादी’ची अब्दुल सत्तार यांच्याबाबत राज्यपालांकडे मागणी
माफी नको राजीनामा द्या ‘राष्ट्रवादी’ची अब्दुल सत्तार यांच्याबाबत राज्यपालांकडे मागणी

माफी नको राजीनामा द्या ‘राष्ट्रवादी’ची अब्दुल सत्तार यांच्याबाबत राज्यपालांकडे मागणी

sakal_logo
By

मोशी, ता. १० ः खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन, आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्यासाठी तसेच मंत्री गुलाबराव पाटील, रवींद्र चव्हाण यांनाही महिलांविषयी अपमानास्पद भाषा वापरल्या संदर्भात
राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याकडे महाविकास महिला आघाडीच्या महिला पदाधिकारी यांनी बुधवारी (ता. ९) भेट घेत निवेदन दिले.
आम्हाला मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर माफी नको, त्यांचा राजीनामाच हवा आहे आणि तुम्ही तो राजीनामा त्वरित घ्यावा, असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील देण्यात आले आहे. राजीनामा घेतला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी रस्त्यावर उतरून महिलांचा अपमान करणाऱ्या अशा नेत्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करतील, असा इशारा महाविकास आघाडीच्यावतीने देण्यात आला.
यावेळी आमदार डॉ. मनीषा कायंदे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे, निर्मला प्रभावळकर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, शीतल हगवणे, मृणालिनी वाणी आदी उपस्थित होते.
फोटो ः 01735, 01736