‘महाविकास आघाडी करणार आंदोलन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महाविकास आघाडी करणार आंदोलन’
‘महाविकास आघाडी करणार आंदोलन’

‘महाविकास आघाडी करणार आंदोलन’

sakal_logo
By

‘महाविकास आघाडी करणार आंदोलन’
मोशी : नाशिक फाटा ते चाकणपर्यंतच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी रस्ते तुटलेले आहेत, रिफ्लेक्टेड नाहीत रस्त्यांच्या कडा धारदार झालेल्या आहेत. अशा विविध कारणांनी या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था आहे. या रस्त्यावरील कायमस्वरूपी वाहतूक कोंडी झालेली असते. या रस्त्यासाठी नुतनीकरणासंबंधी कुठलीही कामाची निविदा काढण्यात आलेली नाही, असे असताना मात्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गुरुवारी (ता. ५) स्थानिक नागरिकांसह येथील टोलनाक्यावर टोलवसुली सुरू केली आहे. हा टोल नाका तत्काळ बंद करण्याची मागणी नाशिक पुणे रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली आहे. टोलनाका बंद न केल्यास मोशी महाविकास आघाडीच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडीचे धनंजय आल्हाट, वसंत बोराटे, परशुराम आल्हाट, योगेश बोराटे, राहुल बनकर, रूपाली आल्हाट, कविता आल्हाट, अतिश बारणे ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, सागर बोराटे, गणेश गायकवाड आदींनी दिला आहे.