शिवरायांच्या परंपरागत पालखीचे मोशीत स्वागत

शिवरायांच्या परंपरागत पालखीचे मोशीत स्वागत

मोशी, ता. ११ : गेल्या वीस वर्षांपासूनची परंपरा जपत मोशीतील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने किल्ले शिवनेरी पासून मोशीपर्यंत आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे श्री नागेश्वर महाराज चौकात स्वागत करण्यात आले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच शिवनेरीहून आणलेल्या पालखीचे ग्रामस्थांनी पूजन केले. परिसरात भगवे प्रवेशद्वार, भगव्या पताका आणि भगवे ध्वज हातात घेऊन ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या घोषणा, ढोल-ताशांच्या गजरातील भव्य मिरवणुका, ठिकठिकाणी ऐकू येणारा पोवाडा यांमुळे संपूर्ण वातावरण भगवे झाले होते.
उत्सव साजरी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या मोशी शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com