
पालेभाज्या व फळांची आवक व भावही स्थिर
मोशी उपबाजार
मोशी, ता. १२ : मोशीतील श्री नागेश्वर महाराज उपबाजारात रविवारी (ता. १२) कोथिंबीर २० हजार ९००, मेथी ३ हजार २७, पालक २ हजार ७०० आदी पालेभाज्यांची एकूण ५३ हजार ४०० जुड्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ती स्थिर आहे. त्यामुळे भावही स्थिर आहेत.
फळभाज्यांमध्ये कांदा, ७६९, बटाटा ६५९, टोमॅटो ५१९, फ्लाॅवर १६८, वाटाणा ८५, कोबी १७१ आदींची एकूण आवक ३ हजार ३२० क्विंटल आवक झाली असून, ही आवक स्थिर आहे. त्यामुळे फळभाज्यांचे भावही स्थिर आहेत.
फळांचीही आवक स्थिर असल्याने भावही स्थिर आहेत.
शेती माल आवक :
* फळभाज्या एकूण आवक : ३ हजार ३२० क्विंटल
* बाजारभाव एक किलोचे (रुपयांमध्ये)
कांदा :
गोल्टा : १३ ते १५, चांगला : १८ ते २०, बटाटा : १८ ते २०, आले : ६० ते ७०, भेंडी : ४५ ते ५०, गवार : ५० ते ७०, टोमॅटो : १३ ते १५, मटार : ३० ते ३५, घेवडा : ३० ते ३५, दोडका : ३५ ते ४०, घोसाळे : ३५ ते ४०, मिरची काळी लवंगी : ४० ते ४५, ज्वाला : ५० ते ५५, मोठी लांब मिरची : ५० ते ६०, ढोबळी : ३० ते ४०, भोपळा : दुधी : १५ ते २०, लाल : २० ते २२, भुईमूग : ६० ते ७०, काकडी : २० ते २५, कारली : २५ ते ३०, गाजर : २५ ते ३०, पापडी : ३० ते ४०, पडवळ : ३० ते ४०, फ्लाॅवर : २० ते २२, कोबी : २५ ते ३०, वांगी : ४० ते ४५, सुरण : ४० ते ५०, तोंडली जाड : ३० ते ४०, तोंडली लहान : ४० ते ४५, बीट : ४० ते ४५, कोहळा : ४० ते ४५, पावटा : ५० ते ६०, वाल : ५० ते ६०, वालवर : ४५ ते ५०, शेवगा : ८० ते ९०, चवळी : ४० ते ४५, मका कणीस : ८ ते १०, लिंबू : १८ ते २०
पालेभाज्यांची एकूण आवक ४८ हजार ८०० जुड्या झाली.
बाजार भाव एका जुडीचा
(रुपयांमध्ये)
कोथिंबीर : ७ ते ८, मेथी : ७ ते ८, शेपू : ७ ते ८, कांदा पात : १० ते १२, पालक : ८ ते १०, मुळा : ८ ते १०, चवळी : ८ ते १०, करडई : ८ ते १०, राजगिरा : १० ते १२, चाकवत : ८ ते १०, अंबाडी : १० ते १५,
फळे एकूण आवक : ६२७ क्विंटल
बाजार भाव एका किलोचे
(रुपयांमध्ये)
सफरचंद : परदेशी : १०० ते ११०, रॉयल : १२० ते १३०, काश्मीर : ९० ते १००, पिअर : ५० ते ६०, किवी : १०० एक बाॅक्स, मोसंबी : ५० ते ६०, संत्री परदेशी : ७० ते ८० महाराष्ट्र : ६० ते ७०, डाळिंब : ८० ते ९०, पेरू : ६० ते ७०, अंजीर : ७० ते ८०, पपई : १५ ते २०, कलिंगड : २० ते २२, चिकू : ५० ते ५५, सीताफळ : ६० ते ७०, केळी : ३० ते ३५, सोनकेळी : ९० ते १००, आलुबुकार : १२० ते १३०, शहाळे : २५ ते ३५, अननस : ४० ते ५०, आवळा : ५० ते ६०, ड्रॅगन फ्रूट : १४० ते १५० रुपये.
मोशी ः श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये झालेली शेतीमालाची आवक.
०१८७०, ०१८७१, ०१८७२