चऱ्होलीतील जलतरण तलाव
एप्रिलपासून सुरू होणार

चऱ्होलीतील जलतरण तलाव एप्रिलपासून सुरू होणार

मोशी, ता. २४ : चऱ्होलीतील वडमुखवाडीमध्ये साकारत असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. विविध दुरूस्त्यांच्या नावाखाली तो एक वर्षाहून अधिक काळ बंद होता. तो सुरू व्हावा म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मागणी केली होती.


जलतरण तलावाची वैशिष्ट्ये...
* आळंदी-पुणे बीआरटीएस व पालखी मार्गालगत हाकेच्या अंतरावर
* एकूण खर्च : ३ कोटी ४९ लाख ८७ हजार १५६ रुपये.
* भूखंड क्षेत्रफळ : ६२ हजार चौ. मीटर
* जलतरण तलावाची एकूण क्षेत्रफळ
* लांबी : २५ मीटर
* रुंदी : १६ मीटर
* खोली : २. १० मीटर
* तलावासाठी आवश्यक असलेला फिल्ट्रेक्शन प्लांट...
* टेन्साईल रफींग पद्धतीचे शेड...
* दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग

कोट :
चऱ्होली- वडमुखवाडी येथील नागरिकांसाठी अद्ययावत असा जलतरण तलाव दुरुस्त्यांसह बांधून पूर्ण झालेला आहे. सध्या त्यामध्ये काही चाचण्या सुरु आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तो खुला करण्यात येईल.
- संजय घुबे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.

फोटो ः ०१८८१.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com