मोशीतील हजारो झाडे मरणपंथाला वरून कडक उन्हाने तर खालून आगीने झाडांचे नुकसान

मोशीतील हजारो झाडे मरणपंथाला
वरून कडक उन्हाने तर खालून आगीने झाडांचे नुकसान

मोशी, ता. २३ : मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक सहामधील आरटीओ रस्ता ते आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रालगतच्या रस्त्यादरम्यान लावलेली हजारो झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. त्यातच झाडांच्या खाली कचरा जाळला असल्याने झाडे करपून गेली आहेत.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्यावतीने शहरामध्ये वड, पिंपळ, चिंच, उंबर, आंबा, फणस, पेरू, जांभूळ, सोनचाफा, अडुळसा, बकुळ, रामफळ, कदंब, बेल, नारळ, कवट, सीताफळ, बोर, अर्जुन, बहावा, कडुनिंब आदी आयुर्वेदिक व पर्यावरण पूरक हजारो झाडांची लागवड करण्यात आली. मात्र, त्यातील अनेक झाडे पाण्याअभावी सुकली आहेत, तर काही झाडांच्या खाली चक्क कचरा जाळला जात आहे. या आगीमुळे ही झाडे जळाली आहेत तर काही अर्धवट करपलेल्या अवस्थेत आहेत.
ही झाडे सध्या साधारणतः दहा ते बारा फुटांपर्यंत वाढलेली आहेत. मात्र, पाण्याअभावी आणि त्यांच्याखालीच जाळल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे ती करपत आहेत. या झाडांना या कडक उन्हाळ्यात वेळेवर पाणी देऊन आणि कचरा जाळणे थांबवून या वाढणाऱ्या झाडांना जीवदान देण्याची मागणी वृक्षप्रेमींमधून जोर धरु लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com