अनधिकृत होर्डिंगचा
मोशी परिसराला विळखा

अनधिकृत होर्डिंगचा मोशी परिसराला विळखा

मोशी, ता. १ : मोशी उपनगरातील विविध भागात आधीच वाहतूक कोंडीचा प्रश्‍न आहे. त्यातच रस्त्यांवर अनधिकृत होर्डिंग्ज लागत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
नुकतेच किवळे रावेत येथे होर्डिंग पडून, काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. मात्र, या घटनेनंतरही अनधिकृत होर्डिंगचा पुन्हा एकदा सुळसुळाट सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
महापालिका या अनधिकृत होर्डिंगला कसा आळा घालणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मोशी उपनगर जसजसं वाढत आहे, तसतसं बांधकाम व्यावसायिकासह अनेक व्यवसाय, विविध प्रसंगाच्या शुभेच्छा आदींच्या प्रसिद्धीसाठी पुणे नाशिक महामार्ग, देहू आळंदी बीआरटी मार्ग, राजा शिवछत्रपती चौक, भारत माता चौक आदी विविध चौकाचौकात बँनरबाजी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
मोठमोठ्या होर्डिंग्सचा सांगाडा महामार्गाच्या सीमारेषेच्या आतापर्यंत येत असल्याचे आढळून आले आहे.
पुणे- नाशिक गंधर्व नगरीजवळील महामार्गालगत एक अवाढव्य सांगाडा पडून आहे.
काही ठिकाणी या होर्डिंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मोशीमध्येही काही वर्षांपूर्वी एका अवाढव्य होर्डिंग कोसळून अपघात घडलेला आहे व किरकोळ अपघातांच्या घटनाही घडत असतात. यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने होर्डिंग्सबाबत महत्त्वाचे पाऊल उचलून उपनगरातील अनधिकृत फलक हटविण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

फोटो ः 01980

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com