Sun, October 1, 2023

सर्व विषयांत
चक्क ३५ गुण
सर्व विषयांत चक्क ३५ गुण
Published on : 2 June 2023, 2:03 am
मोशी, ता. १ : एकीकडे वाडा तालुक्यातील सोनाळे या खेडेगावातील जिऊ निमकर हिने सर्व विषयात शंभर गुण मिळवून शंभर टक्के गुण मिळवले आहेत तर दुसरीकडे भोसरीतील श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अलका लेवडे या विद्यार्थिनीने सर्व विषयांत पस्तीस गुण मिळवत टक्केवारीही पस्तीसच मिळवली आहे. भोसरीतील श्री भैरवनाथ विद्यालयाचा निकाल ९३.७० टक्के लागला आहे. नाजिया शेख हिला ९४ टक्के, गोपाळ राठोडला ९२.६० टक्के तर गणेश पुजारी याला ९२.२० टक्के गुण मिळाले.