डोळसनाथ महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोळसनाथ महाराज मंदिरात
विविध धार्मिक कार्यक्रम
डोळसनाथ महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

डोळसनाथ महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे, ता. ४ : येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात अक्षय तृतीया दिनी रुद्रयाग, चंदन उटीनिमित्त विधी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंपरेनुसार हा विधी केला जातो. सकाळी श्रींची महापूजा व अभिषेक, श्रींची चंदन उटी,
रुद्रयाग होमहवन करण्यात आले. श्री डोळसनाथ महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन, हरिपाठ करण्यात आला. काळभैरवाअष्टक पठण व दीपमाळ प्रज्वलन झाले. रामायणाचार्य उद्धव महाराज अटाळीकर विदर्भ यांचे प्रवचन झाले. श्रींची आरती झाली. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्ट, श्री डोळसनाथ तालीम मंडळ, श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती, सर्व भजनी मंडळे, गणेश मंडळे व समस्त गावकरी यांच्या वतीने हा कार्यक्रम झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b09964 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top