तळेगावात राजकीय कार्यक्रमांना जोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावात राजकीय कार्यक्रमांना जोर
तळेगावात राजकीय कार्यक्रमांना जोर

तळेगावात राजकीय कार्यक्रमांना जोर

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे, ता. ५ : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिला. काहीशी मरगळ आलेल्या भावी नगरसेवकांनी अंग झटकायला सुरुवात केली. राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय असलेले सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या नगरसेवक होण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. काही काळ मंदावलेल्या इव्हेंटचा जोर आता वाढणार आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची मागील निवडणूक १४ डिसेंबर २०१६ झाली होती. त्यावेळी नगरपरिषदेचे १३ प्रभाग आणि २६ उमेदवार होते.
यंदाच्या निवडणुकीत वाढलेल्या लोकसंख्येमुळे १४ प्रभागांत २८ उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. या निवडणुकीत द्विसदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक असणार आहे. भावी नगरसेवकांची आतापासूनच चाचपणी सुरू आहे. वेगवेगळ्या निमित्तानेच इच्छुक मतदारांचा कानोसा घेत आहे.
पूर्वी झालेल्या प्रभागरचनेची तोंडी माहितीनुसार इच्छुक उमेदवार प्रभागरचनेचा आराखडा व कार्यकर्ते आपले वेगवेगळे आडाखे बांधत आहेत. कोणता प्रभाग सुरक्षित आहे, कोणता प्रभाग कोणत्या उमेदवाराला निवडणुकीसाठी योग्य राहील याची चर्चा सुरू आहे. एका प्रभागांमध्ये जास्तीत जास्त चार हजारांपर्यंत मतदारांची संख्या असेल. सर्वच इच्छुक उमेदवारांना वेध लागलेले असून, काही इच्छुक उमेदवारांनी पुन्हा जनसंपर्कावर भर दिला जात आहे. इच्छुक भेटीगाठी तसेच अन्य माध्यमातून आपला संपर्क वाढविला जात आहे. नगरपरिषदेच्या प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवलेला होता. प्रभागरचना होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अंतिम प्रभागरचना जाहीर होण्याची जाहीर होते. या बाबत इच्छुक व कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण येत असल्याचे दिसून येते.

इच्छुकांची चाचपणी
अंतिम प्रभागरचना जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या नियोजनाची जोरदार तयारी चालवलेली असून, १४ प्रभागांत संभ्रम आहे. कोणते उमेदवार इच्छुक आहेत. याचा अंदाज प्रशासकीय राजवट लागल्यापासून घेतला जात होता. उमेदवाराला पक्षाने दिलेल्या उमेदवारीबाबत मतदारांचे त्याविषयीचे मत काय आहे, याचा कानोसा घेतला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b09972 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top