
आगामी निवडणूक बातमीस जोड
‘‘आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांपेक्षा सामाजिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या सर्वसामान्य उमेदवारांची मोठी फौज आमच्याकडे आहे. निवडणूक कधीही झाली, तरी आमची लढाईची तयारी आहे.’’
- किशोर आवारे, संस्थापक, जनसेवा विकास समिती
‘‘न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आहे. वीस टक्के राजकारण व ऐंशी समाजकारण हे आमचे ब्रीदवाक्य आहे. त्याच धर्तीवर आमची लढण्याची तयारी आहे.’’
- गणेश काकडे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
‘‘भाजप या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे. सक्षम व होतकरू उमेदवार देणार आहे. इच्छुकांची मोठी संख्या आमच्याकडे आहे.’’
रवींद्र माने, शहराध्यक्ष, भाजप
‘‘न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणुका वेळेत पार पडल्या, तर लढण्याची तयारी आहे. इच्छुकांची चाचपणी सुरू आहे. सक्षम उमेदवारांना संधी दिली जाईल.’’
- यादवेंद्र खळदे, शहराध्यक्ष, काँग्रेस
‘‘आगामी निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली तर शिवसेना महाविकास आघाडी सोबत लढेल. स्वतंत्र लढली तर स्वतंत्रपणे लढणार. महत्त्वाच्या प्रभागात सक्षम उमेदवार तयारीत आहे.’’
- दत्तात्रेय भेगडे, शहरप्रमुख, शिवसेना
Web Title: Todays Latest Marathi News Pim22b09974 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..