सोयाबीन बियाणांची पेरणीपूर्व उगवणक्षमता तपासावी ः पडवळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीन बियाणांची पेरणीपूर्व
उगवणक्षमता तपासावी ः पडवळ
सोयाबीन बियाणांची पेरणीपूर्व उगवणक्षमता तपासावी ः पडवळ

सोयाबीन बियाणांची पेरणीपूर्व उगवणक्षमता तपासावी ः पडवळ

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे, ता. ५ : ‘पुढील महिन्यात होणाऱ्या पेरणीसाठी सोयाबीन बियाणांची पेरणीपूर्व उगवणक्षमता तपासणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी घरच्या घरी उगवणक्षमता तपासून घ्यावी,’ असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी केले.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या बैठकीत पडवळ बोलत होते. शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेल्या सोयाबीन बियाण्याची चाळणी करून त्यामधील काडीकचरा, खडे, लहान व खुरटलेले बियाणे वेगळे करावेत. चाळणीनंतर स्वच्छ झालेले समान आकाराचे बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी निवडावे, असेही पडवळ यांनी यावेळी नमूद केले.
कृषी सहायक प्रियांका पाटील म्हणाल्या की, गेल्या वर्षी सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेसंबधी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे यावर्षी कृषी विभागाकडून गावागावांत बियाणे उगवणक्षमता व बिजप्रक्रीया प्रात्यक्षिक घेतले जात आहे.
---------------------
उगवण क्षमता तपासण्याची प्रक्रिया
-----------------
एक गोणपाट घेऊन पाण्याने ओले करावे. १०० बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर १० × १० च्या दहा रांगा कराव्या. गोणपाटेची गुंडाळी करून चार दिवस पाण्याचा शिडकावा मारावा. चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बीजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. जर ती संख्या ६० असेल तर उगवण क्षमता ६० टक्के आहे, असे समजावे. जर ती संख्या ८० असेल तर उगवणक्षमता ८० टक्के आहे असे समजावे. अशा पद्धतीने घरच्या घरी उगवण क्षमतेचा अंदाज घेता येतो.
----------------
तळेगाव दाभाडे ः बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b09976 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top