
पावसाळापूर्व नालेसफाईच्या स्वच्छता कामाला सुरुवात
जुनी सांगवी, ता. ६ ः पावसाळापूर्व नालेसफाईच्या स्वच्छता कामाला पालिका आरोग्य विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. जुनी सांगवी मुळा नदी व पवना नदी या दोन्हींच्या मध्ये असल्याने दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या पावसाने नद्यांना पाणी आल्यास चेंबर तुंबणे, पूर आल्यास जलकोंडी होणे या प्रकारांना सामोरे जावे लागते. याची खबरदारी म्हणून नाला परिसरात हवेने आलेला कचरा, झाडेझुडपे गवत याची स्वच्छता करण्यात येत आहे. पवना नदीजवळील माहेश्वरी चौक, काटे चौक व नर्मदा गार्डन जवळील नाला, मुळा नदी किनारा रस्ता शितोळे शाळा याठिकाणी नाले आहेत. याचबरोबर गणपती विसर्जन घाट, दशक्रिया विधी घाट या सर्व ठिकाणी स्वच्छता करण्यात येत आहे. नाल्यांमधून पडलेला कचरा व वाहत्या पाण्यामुळे चेंबरमध्ये कचरा अडकून पावसाळ्यात चेंबर तुंबण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागते यासाठी पावसाळा पूर्व नालेसफाईची कामे सुरू करण्यात आली असल्याचे आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार यांनी सांगितले. आरोग्य निरीक्षक संतोष जुनवणे, आरोग्य कर्मचारी सागर भांडे, बंडू जाधव, संजय पाटील, माधव जाधव, विजय जगताप व सहकाऱ्यांच्या सहभागातून माहेश्वरी चौक येथील नालेसफाई सुरू करण्यात आली आहे.
.
Web Title: Todays Latest Marathi News Pim22b09977 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..