मुळानदी किनारा रस्त्यावर थर्मोप्लास्टर पांढरे पट्टे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळानदी किनारा रस्त्यावर थर्मोप्लास्टर पांढरे पट्टे
मुळानदी किनारा रस्त्यावर थर्मोप्लास्टर पांढरे पट्टे

मुळानदी किनारा रस्त्यावर थर्मोप्लास्टर पांढरे पट्टे

sakal_logo
By

बातमीचा परिणाम -

जुनी सांगवी, ता. ७ ः या परिसरात गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी नागरिकांमधून मागणी होत होती. याबाबत ‘सकाळ’मधून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत स्थापत्य विभागाकडून गतिरोधकाऐवेजी थर्मोप्लास्टर पांढरे पट्टे लावण्यात आले आहेत.

जुनी सांगवी मुळा नदी किनारा रस्ता शितोळे नगर शिवांजली कॉर्नर ते दत्तमठ रस्ता या रस्त्यावर भरधाव वेगाने रहदारी होत होती. रहिवासी भागात शाळा, भाजी विक्री, किराणा मालाची दुकाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुळानगर झोपडपट्टी वस्ती व या रस्त्याला जोडणाऱ्या उभ्या गल्ल्या. यामुळे या परिसरात नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. भरधाव वेगाने या रस्त्यावर होणारी रहदारीमुळे येथे अपघातांच्या घटना घडत होत्या.
नुकतेच स्थापत्य विभागाकडून या रस्त्यावर आवश्यक ठिकाणी गतिरोधकाऐवेजी थर्मोप्लास्टर पांढरे पट्टे लावण्यात आल्याने वाहनचालकांना गाड्यांचा वेग कमी करावा लागत आहे. यामुळे अपघातांच्या घटना कमी होण्यास मदत होणार आहे.

नागरिकांमधून समाधान व्यक्त
या रस्त्यावरून पुणे-औंधकडे ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. सकाळी व सायंकाळी व्यायाम व फेरफटका मारण्यासाठी या रस्त्याचा नागरिक मोठ्या प्रमाणावर वापर करतात. याचबरोबर पीएमपीएलची बससेवा या मार्गाने होत आहे. थर्मोप्लास्टर पट्टे लावल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b09988 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top