
कामगारवर्गाला बँकेच्या कर्जाचा मोठा आधार
तळेगाव दाभाडे, ता. ९ : ‘‘घर, मुलांचे शिक्षण, लग्न आणि वृद्धकाळातील तजवीज अशा चाकोरीबद्ध आयुष्याच्या जीवन मर्यादा असलेल्या कामगारवर्गाला बँकेच्या कर्जाचा मोठा आधार आहे. कर्जाची वेळेवर परतफेड केलेल्या कामगारांची समाजात पत वाढत आहे,’’ असा विश्वास मावळ तालुका राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष व पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बॅकचे संचालक बबनराव भेगडे यांनी दिला. येथे झालेल्या मेळाव्यात भेगडे बोलत होते. कामगारांच्या घामातून कारखानदारी वाढली. कारखानदारीमुळे नागरीकरण वाढत आहे. महागाई आणि उच्च राहणीमान पाहता कामगार बांधवांनाही सन्मान उभे राहते यावे, यासाठी बॅंक कायमच कर्जरूपाने कामगारांच्या पाठीशी उभी आहे. जिल्हा बॅक असोसिएशनचे व बँकेचे अध्यक्ष सुभाष मोहिते, सुभाष गांधी, जनार्दन रणदिवे, सुभाष नडे, बिपिन शहा, रमेश सोनवणे, दिलीप दगडे, संजय गुगळे, अंबर चिंचवडे, संजय जगताप उपस्थित होते. संजय जाधवर यांनी प्रास्ताविक केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pim22b09997 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..