कृष्ण प्रकाश यांनी कोट्यवधी रुपये उकळले : आमदार अण्णा बनसोडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Krishna Prakash and MLA Anna Bansode
पिंपरीच्या माजी पोलिस आयुक्तांचा चेहरा समाजापुढे आणा : आमदार ब

कृष्ण प्रकाश यांनी कोट्यवधी रुपये उकळले : आमदार अण्णा बनसोडे

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी गंभीर आरोप (Allegations) केले आहेत. त्यांनी याबाबत नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांना पत्र (Letter) दिले आहे. चांगल्या वित्तीय संस्थांची दिवाणी तक्रार असताना अनेक गुन्हे दाखल करून कोट्यवधी रुपये उकळल्याचाही आरोप केला आहे. यापूर्वीच्या आयुक्तांचा खरा चेहरा समाजापुढे उघड करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कृष्ण प्रकाश यांची २० एप्रिल २०२२ रोजी मुंबईत विशेष पोलिस महानिरीक्षक व्ही.आय.पी.सुरक्षा या पदावर बदली झाली. त्यांच्या जागी अंकुश शिंदे पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून रुजू झाले. कृष्ण प्रकाश यांच्याविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिल्याचे बोलले जात आहे. या व्हायरल झालेल्या पत्रात शेकडो कोटी गोळा केल्याचा आरोप आहे. परंतु, त्यांनी आपण पत्र लिहिले नसल्याचे स्पष्ट केले. या पत्रामुळे माझी आणि पोलिस खात्याची बदनामी झाली आहे. त्यामुळे हे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

खोटे गुन्हे नोंदवणे, पोलिस बळाचा वापर करून ताबा मिळवून देणे, खोटे गुन्हे दाखल करून अनेक कोटी रुपये उकळणे, ​​मागासवर्गीय कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे अशा स्वरूपाचे आरोप आमदार अण्णा बनसोडे यांनी या पत्रात केले आहेत.

‘माझे आणि आमदार बनसोडे यांचे बोलणे झाले आहे. त्यांनी पत्र दिले नाही. परंतु, दिले असल्यास मी त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करेल. त्यांच्या मुलाला मी अटक केली होती, म्हणून त्यांनी हे चुकीचे आरोप केले आहेत.’ पोलिस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले, ‘आमदार बनसोडे यांचे पत्र अद्याप माझ्याकडे आले नाही.’

- कृष्ण प्रकाश, माजी पोलिस आयुक्त

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10001 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top