पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन उत्साहात
पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन उत्साहात

पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन उत्साहात

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १२ ः जुनी सांगवीतील पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांच्या हस्ते करण्यात आले. अनिता शितोळे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, मराठवाडा जनविकास संघाचे अरुण पवार, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, प्रणव राव, ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अरुण बागडे, कार्याध्यक्षा वृषाली मरळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अतुल शितोळे म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नागरिकांना आपली सुख-दुःखे मांडता यावीत, या उद्देशाने माजी महापौर नानासाहेब शितोळे यांनी या ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. ज्येष्ठांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली. वर्धापनदिन दिनानिमित्त आठवडाभर विविध सांस्कृतिक, बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश देशमुख यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10009 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top