तळेगावात पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ दोन लाख जणांची सुरक्षितता केवळ पन्नास-पंचावन्न जणांच्या हातात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावात पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ
दोन लाख जणांची सुरक्षितता केवळ पन्नास-पंचावन्न जणांच्या हातात
तळेगावात पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ दोन लाख जणांची सुरक्षितता केवळ पन्नास-पंचावन्न जणांच्या हातात

तळेगावात पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ दोन लाख जणांची सुरक्षितता केवळ पन्नास-पंचावन्न जणांच्या हातात

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे, ता. १३ : दोन लाख लोकसंख्या असलेल्या तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांची सुरक्षितता अवघ्या पन्नास ते पंचावन्न पोलिस बांधवांच्या हातात आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीद. शहरातील पोलिस बांधव हेच ब्रीदवाक्य ठेवून काम करतात. आपली ड्यूटी बजावताना ते कुठेही कसूर करीत नाहीत. मात्र, त्यांच्याकडे पुरेशी कर्मचारी संख्या असल्यास त्यांनाही काम करणे सोपे जाऊ शकते, त्यांच्या कामात सुसूत्रता येऊ शकते.

तळेगाव दाभाडे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तळेगाव दाभाडे, तळेगाव स्टेशन, सोमाटणे, गहुंजे, साळुंब्रे, दारुंब्रे, कुसगाव पमा, चांदखेड, आढले खुर्द, आढले बुद्रुक, पाचाणे, पुसाणे, बेबडओहोळ, परंदवडी, धामणे, उर्से, आढे, शिरगाव ही गावे येतात. आर्थिक, राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील शहर व गावे या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात.

खून, मारामाऱ्या, चोऱ्या, अपघात, ऑनलाइन फसवणूक, वादविवाद, भांडणे यासारख्या गुन्ह्यांच्या अनेक तक्रारी सहज हाताळून शहरात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी पोलिस सदैव कार्यरत असतात. यासाठी पोलिसांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या आहेत. रात्रीची गस्त वाढवली आहे. पोलिसांनी नव्या तंत्रज्ञानाची मदत घेत पोलिस बांधवांच्या ड्यूटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी क्यूआर कोड विकसित केला.

पुणे पोलिस आयुक्तालयाची विभागणी झाल्यावर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाशी मावळातील पोलिस ठाणी जोडली गेली. अपुऱ्या मनुष्यबळाची झळ तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याप्रमाणेच तळेगाव एमआयडीसी, देहूरोड, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर व ग्रामीण याही पोलिस ठाण्यांनाही बसते आहे.

शहरात वेळोवेळी पेट्रोलिंग केले जाते. बसस्थानक, शाळा, महाविद्यालय परिसरात गस्त वाढवली आहे. शैक्षणिक संस्थांची मदत घेतली जात आहे. पुरुष अथवा महिलांनी आमिषाला बळी पडू नये. रिक्षात एकट्याने प्रवास करतानाची माहिती कुटुंबीयांना फोनवरून द्यावी. लिफ्टमध्ये जाताना छेडछाड होत असल्यास लिफ्टच्या प्रत्येक मजल्याचे बटण दाबावे. ऑनलाइन फसवणुकीपासून सावध रहा. अनोळखी व्यक्तीबरोबर प्रवास टाळा.
- मधुकर सावंत, पोलिस निरीक्षक

तळेगाव दाभाडे पोलिस
•लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ९६५२१
• २०२२ला अंदाजे लोकसंख्या दोन ते अडीच लाख
• २० गावे
• धार्मिक स्थळे
मंदिरे ४२, मस्जिद ५, जैन मंदिरे ५, इदगाह मैदान ४, कब्रस्थान ४, चर्च ३, बुद्धविहार ३,
• भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10013 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top