तळेगाव दाभाडेत आरोग्याचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव दाभाडेत आरोग्याचा जागर
तळेगाव दाभाडेत आरोग्याचा जागर

तळेगाव दाभाडेत आरोग्याचा जागर

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे, ता. १४ : पुणे जिल्हा परिषदेच्या तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कात टाकली आहे. सुसज्ज इमारतीत आरोग्य सेवेचा नंदादीप अखंड तेवत आहे. रविवारी सार्वजनिक सुटीचा दिवस असला, तरी हे केंद्र रविवारी पूर्णवेळ सुरू असते. येथील स्थानिक कर्मचारी रविवारऐवजी शनिवारी सुटी घेतात.

ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवेसह विविध तपासण्या केल्या जात आहेत. सतरा गावे आणि तीन आरोग्य उपकेंद्र असलेल्या या रुग्ण मंदिरात ग्रामीण भागातील ४४ हजार ३१ रुग्ण आरोग्य सेवेचा जागर करीत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात लसीकरणावर भर दिलेल्या आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे कॅम्प लावले जात आहेत. शहराच्या मध्यावर असलेल्या या केंद्रात ज्येष्ठ नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लशीच्या बूस्टर डोससाठी येत आहेत, तर आंबी, निगडे, इंदोरी या तीन उपकेंद्रातील निगडे, ठाकरवाडी, आंबळे, मंगरूळ, इंदोरी, ठाकरवाडी, सुदुंबरे, माळवाडी, सुदवडी, आंबी, वारंगवाडी, नाणोली तर्फे चाकण, जांबवडे, नवलाख उंबरे, बधलवाडी, मिंडेवाडी, जाधववाडी, वराळे, गोळेवाडी या गावांतील नागरिक आरोग्य सुविधेसाठी येत आहेत.

विशेषत: महिलांची या आरोग्य केंद्राशी नाळ जोडली आहे. कुटुंबकल्याण योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा योजना, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांसाठी हजेरी असते. आरोग्य केंद्र आणि महिलांना जोडणाऱ्या आशा वर्कर्स यांचा मोठा दुवा आहे.

‘‘आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय उपक्रमाअंतर्गत येणारे सर्व कार्यक्रम राबविण्यावर भर आहे. याशिवाय सर्व प्रकारचे लसीकरण, कुटुंब कल्याणच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कोरोनाकाळात लसीकरणाचा वेग चांगला होता.’’
- डॉ. उन्मेष गुट्टे, आरोग्याधिकारी

‘‘गावांतील महिलांना आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत आरोग्याबाबत माहिती दिली जाते. ज्याचा लाभ माता व बालकांच्या लसीकरणासाठी होतो. तसेच, शासनाच्या आरोग्यविषयक योजनेची माहिती मिळते.’’
- छाया मराठे, रहिवासी, नाणोली तर्फे चाकण

आरोग्य केंद्र दृष्टिक्षेपात...
उपकेंद्र ः ३
गावे ः १७
ग्रामीण लोकसंख्या ः ४४,०३१
आरोग्य अधिकारी व कर्मचारी ः ३३
आशा वर्कर्स (शहरी) ः २३
आशा वर्कर्स (ग्रामीण) ः २०
आशा गटप्रवर्तक ः १

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10016 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top