
अनधिकृत पत्राशेड पिंपळे गुरवमध्ये हटविले
जुनी सांगवी, ता. १४ ः पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक ते साठ फुटी रस्ता, रामकृष्ण मंगल कार्यालय परिसरात अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली. यावेळी नदी किनारा भागातील निळ्या पूररेषेत व्यावसायिकांनी अनधिकृतरीत्या उभारलेल्या ६७ ते ७५ हजार चौरस फूट क्षेत्रफळापेक्षा अधिक असणाऱ्या पत्राशेड बांधकामावर आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई झाली.
पिंपळे गुरव येथील नदी किनारा भागातील निळ्या पूररेषेत व्यावसायिकांनी अनधिकृतरीत्या पत्राशेड बांधकाम केले होते. यावर महापालिकेच्या ‘ह’, ‘ड’ व ‘ग’ प्रभाग यांच्या सयुक्तिक कारवाईतून अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. याप्रसंगी क्षेत्रीय कार्यालयातील तिन्ही प्रभाग अधिकारी विजय कुमार थोरात, उमाकांत गायकवाड, रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता सुनील भागवानी, उपअभियंता राजेंद्र डुंबरे, कनिष्ठ अभियंता वंदना मोरे, स्थापत्य अभियंता राजदीप तायडे, संदीप हजारे, अमरजित म्हस्के आदी उपस्थित होते. सकाळी दहा वाजता सुरू झालेली कारवाई सायंकाळी सहा वाजल्यापर्यंत सुरू होती.
Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10017 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..