मुळानदीवरील बोपोडीतील पुलाचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळानदीवरील बोपोडीतील पुलाचे काम सुरू
मुळानदीवरील बोपोडीतील पुलाचे काम सुरू

मुळानदीवरील बोपोडीतील पुलाचे काम सुरू

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १५ ः येथे नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या मुळा नदीवरील पुणे बोपोडी शहराला जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे येत्या दोन वर्षांत पिंपरी-चिंचवड व पुणे शहराच्या वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. गेली अनेक वर्षांपासून हा पूल प्रस्तावित होता. सद्यःस्थितीत जुनी सा़गवी, नवी सांगवी पिंपळे गुरवकरांना दापोडी अथवा सांगवी फाटा व मुळानदिवरील स्पायसर औंध रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुलावरून रहदारी करावी लागत आहे. अरुंद पूल व वाढलेला रहदारीचा ताण यामुळे अनेकदा येथे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सांगवी परिसरातील नागरिकांना बोपोडी, खडकी तसेच पुणे शहराकडे जाण्यासाठीचे अंतर कमी होऊन वेळेची व इंधनाची बचत होण्यास मदत होईल. इतर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. स्पायसर कॉलेज रस्त्यावरील ताण कमी होऊन या पुलामुळे वेळ व इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहराची हद्द पुन्हा एकदा जोडली जाईल.

अशी आहे पुलाची व्याप्ती
- एकूण लांबी ः ७६० मीटर
- एकूण रुंदी ः १८.६० मीटर
- गाळ्यांची लांबी ः १२५ मीटर (२५ मी.×५ गाळे)
- पुणे महापालिका बाजूकडील पोहोच रस्त्याची लांबी ः ५५५ मी
- पिंपरी-चिंचवड महापालिका बाजूकडील पोहोच रस्त्याची लांबी ः ८० मी
- वाहनमार्ग : ७ मीटर दोन्ही बाजूस (एकूण १४ मी.)
- दुभाजक ः ०.६० मी
- पदपथ ः १.५० मी. दोन्ही बाजूस (खंडित कर्बसहित)
- संरक्षक भिंत ः ०.५० मी. दोन्ही बाजूस आरसीसी
- संरक्षक भिंतीवर एक मी. उंचीची अतिरिक्त भिंत
- १.६ मी.उंचीचे जीआय चेनलिंक फेन्सींग दोन्ही बाजूस
- ६०० मिमी. व्यासाची पावसाळी लाइन चेंबरसहित दोन्ही बाजूस

‘‘कामाला दोन्ही बाजूने सुरुवात करण्यात आली आहे. मे. मॅप्स ग्लोबल सिव्हिल प्रा.लि. मे.टी ॲण्ड की इन्फ्रा लि. या कंपन्यांना ठेका दिलेला आहे. सध्या खोदकाम व डिझाइन आराखडा करण्याचे काम सुरू आहे. दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’
- श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता महापालिका

जुनी सांगवी : मुळा नदीवरील पिंपरी-चिंचवड पुणे शहराला जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10018 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top