महागाई विरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागाई विरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन
महागाई विरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

महागाई विरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १५ ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वाढती महागाई व वाढलेल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीविरोधात येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात सिलेंडर आडवा ठेवून तिरडी आंदोलन करीत निषेध करण्यात आला.
प्रशांत शितोळे म्हणाले, ‘‘सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. स्वयंपाकाचा गॅस एक हजार पार झाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीने नागरिकांचे घर चालविण्याचे बजेट कोलमडले आहे. सर्वसामान्य जनता महागाईने मेटाकुटीला आली आहे. कॉंग्रेसच्या काळात तीनशे रुपयांचा गॅस तीस रूपयाने दरवाढ झाल्यावर आक्रोश करून सत्तेत बसलेले भाजपाई आत्ता कुठे आहेत. आधीच कोरोनाचे संकट झेलत त्यातून सावरत असतानाच महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले आहे. केंद्राने महागाईचे भूत नागरिकांच्या मानगुटीवर लादल्याने भ्रष्ट व नियोजनशून्य सरकारला घरी बसवले पाहिजे. महिला गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित महिलांनी महागाईविरोधात संतप्त भावना व्यक्त करीत केंद्र सरकारचा निषेध केला. ''महागाई वाढत जाय,गरिबांने खायचे काय'', ''चिंतेत ताई माई,कधी संपणार महागाई'', ''कुठं गेला जाहिरनामा, झाला आमचा खिसा रिकामा, '' हिंदू मुस्लिम भाई भाई, जिवावर उठली महागाई, अशा घोषणा देत उपस्थितांनी निषेध नोंदवला. बांबू, पांढरे कापडाच्या प्रतिकात्मक तिरडीवर गॅस सिलेंडर आडवा ठेवून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. उज्वला ढोरे, पंकज कांबळे, बबन शितोळे, मंगेश काळे, कोमल कवडे, मनीषा पुरी, संजय गंभीरराव, सुनील ढोरे, ओंकार ढोरे, सुनील गावडे, विशाल नायडू, विशाल ढोरे, विशाल जाधव, विलास कांबळे, बाबासाहेब ढमाले आदी उपस्थित होते. सांगवी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सूत्रसंचलन बाळासाहेब पिल्लेवार यांनी केले. आभार जावेद शेख यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10020 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top