पिंपळे सौदागर येथे अतिक्रमण कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळे सौदागर येथे अतिक्रमण कारवाई
पिंपळे सौदागर येथे अतिक्रमण कारवाई

पिंपळे सौदागर येथे अतिक्रमण कारवाई

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १७ ः महापालिकेच्या वतीने शहर व उपनगरात अतिक्रमण कारवाईचा धडाका लावला असून, कासारवाडी, पिंपळे गुरव, भोसरी, मोशीनंतर पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्ता परिसरातील असणाऱ्या अनधिकृत पत्राशेड बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जोरदार कारवाई करण्यात आली. कुणाल आयकॉन रोडवरील ५३ व्यावसायिक दुकानांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. एकूण ३५००० चौ. फूट क्षेत्रफळ पत्राशेड अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले आहे. कारवाई दरम्यान या परिसरातील काही दुकानदारांनी स्वतःहून आपले पत्राशेड असलेले बांधकाम हटविले. ही कारवाई ‘ड’ क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या अधिपत्याखाली अतिक्रमण विभागाकडून करण्यात आली. अतिक्रमण कारवाई सुरू असताना ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी विजय थोरात, कार्यकारी अभियंता सुनील भागवानी, उपअभियंता राजेंद्र डुंबरे, संजय तूपसाखरे, कनिष्ठ अभियंता वंदना मोरे, सचिन कुतवळ, स्थापत्य अभियंता राजदीप तायडे, संदीप हजारे, जयराम कानडे, ऋषिकेश कांबळे उपस्थित होते. सांगवी पोलिसांकडून एकूण १० पोलिस मनुष्यबळ पुरविण्यात आले. ३ जेसीबी, १ ब्रेकर जेसीबी, १ ट्रक, २० मजुर, ६० महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या सहकार्याने अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10031 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top