
पिंपळे निलख येथे चेंबरची दुरूस्ती
जुनी सांगवी, ता. १३ : पिंपळे निलख येथे मुळा नदीच्या पाण्यात काही दिवसांपासून सांडपाणी मिसळत होते. येथील पर्यावरणप्रेमी शिरिष साठे यांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दुरुस्ती करण्याबाबत मागणी केली होती. नदीत मिसळणारे सांडपाण्यामुळे पाण्याचा रंग हिरवा होऊन त्याला वास येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. याबाबत स्थापत्य विभागाकडून चेंबरमधून होणारी सांडपाण्याची गळती थांबवून दुरुस्ती केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नदीत चेंबर लिकेज मधून सांडपाणी मिसळत होते. यामुळे पाण्याच्या वासासह डास किटकांच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले होते. चेंबर दुरुस्ती नंतर नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
्-शिरिष साठे, सामाजिक कार्यकर्ते
चेंबरची दुरुस्ती केली आहे. याचबरोबर परिसर स्वच्छतेची कामे महापालिकेच्या वतीने सुरू आहेत.
-वर्षा कदम, कनिष्ठ अभियंता पिंपळे निलख
पिंपळे निलख : नदीपात्रात मिसळणाऱ्या सांडपाणी चेंबरची दुरुस्ती केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10087 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..