गुन्हे वृत्त कर्ज देण्याच्या बहाण्याने बावधनमध्ये फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
कर्ज देण्याच्या बहाण्याने 
बावधनमध्ये फसवणूक
गुन्हे वृत्त कर्ज देण्याच्या बहाण्याने बावधनमध्ये फसवणूक

गुन्हे वृत्त कर्ज देण्याच्या बहाण्याने बावधनमध्ये फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ : ट्रस्टद्वारे कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बावधन येथे घडला.
रघुनाथ नामदेव भुंडे (वय ४८, रा. बावधन) व एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी महिला यांना ट्रस्टद्वारे साडेसात लाख रुपये कर्ज देतो असे सांगितले. त्यानंतर कर्ज देण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. कागदपत्र तयार करण्याचे खोटे सांगून ऑनलाइनद्वारे एक हजार रुपये घेतले. आधार कार्ड, पॅनकार्ड बँकेचा धनादेश घेतला. मात्र, कोणत्याही प्रकारचे कर्ज दिले नाही. फिर्यादीने दिलेले कागदपत्र परत मागितले असता, आरोपी त्यांच्या घरी आले. त्यांना फेसबुक पोस्ट डिलीट करण्याबाबत धमकी देऊन शिवीगाळ केली. दरम्यान, या आरोपींनी अशाप्रकारे इतरही अनेक महिलांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. सांगली पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--- ---

कोयत्याचा धाक दाखवून ऐवज लुटला

पिंपरी ः कोयत्याचा धाक दाखवून ऐवजासह दुचाकी पळवली. ही घटना सुसखिंड येथे घडली.
याप्रकरणी मकरंद दत्तात्रेय पवार (रा. किरकिटवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे मंगळवारी (ता. २८) रात्री अकराच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गाने जात होते. दरम्यान, ते सूस खिंड येथे थांबले असताना रिक्षातून चौघेजण त्यांच्याजवळ आले. त्यांच्याकडील रोकड व मोबाईल असा सात हजारांचा ऐवज लुटला. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या दुचाकीची चावी जबरदस्तीने घेऊन गेले. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--------

रहाटणीमध्ये घरफोडी

कुटूंबीयांसह हॉटेलमध्ये जेवायला गेले असताना, चोरट्यांनी घरातून दीड लाखाचा ऐवज चोरला. ही घटना रहाटणी येथे घडली.
या प्रकरणी चैतन्य साखरचंद बधान (रा. द्वारका साई सोसायटी, गोडांबे कॉर्नर, राहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबीयांसह हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. या कालावधीत घराचा दरवाजा तोडून, चोरटा आत शिरला. आतील ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची वेढणी व ८९ हजाराची रोकड असा दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10126 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..