गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

निगडीत टोळक्याचा धुडगूस;
तरुणाला जिवे मारण्याची धमकी

पिंपरी : टोळक्याने कोयते भिरकावून धुडगुस घालून एका तरुणाला जिवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत माजवली. हा प्रकार निगडीतील अजंठानगर येथे घडला. याप्रकरणी निखिल विलास गजरमल (अजंठानगर, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष ऊर्फ व्यंक्या पवार, भैय्या साबळे, आकाश पौळ, सौरभ वाघमारे, राजू तिरकर (सर्व रा. अजंठानगर, निगडी), पवन लष्करे (रा. रामनगर, चिंचवड) व सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी (ता.१४) रात्री साडे आठच्या सुमारास फिर्यादी व त्यांची पत्नी पूजा या पाणी भरत होते. दरम्यान, टोळके निखिलला मारहाण करण्याच्या उद्देशाने आरडाओरडा, शिवीगाळ करीत कोयते घेऊन आले. त्यावेळी काही नागरिकांनी आरोपींना अडवले असता आरोपींनी नागरिकांना कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींना घाबरून सर्वजण घरांमध्ये पळून गेले असता आरोपींनी निखिल यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून निखिलला जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
कामगार महिलेसोबत कंपनीतील ठेकेदाराने गैरवर्तन करीत तिचा विनयभंग केला. हा प्रकार एमआयडीसी भोसरी येथील एका कंपनीत घडला. कोतावळे काका (वय ६०, रा. गवळीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला एमआयडीसी भोसरीतील एका कंपनीत काम करीत असताना आरोपीने त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यांना लॉजवर व घरी भेटण्यासाठी बोलावून त्यांच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. तसेच वारंवार शिवीगाळ केली. पोलिस अधिक तपास तपास करीत आहेत.

चिंचवडमध्ये घरात शिरून एकाला मारहाण
घरातील किरकोळ कारणावरून भावकीतील चौघांनी एकाला घरात शिरून दांडक्याने मारहाण केली. हा प्रकार चिंचवड येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. सावरलमल गणपतलाल मीना (वय ४२, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हेमंत सिंह मीना, रामसिंह मीना, दीपक मीना, आर्यन मीना यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे शुक्रवारी रात्री त्यांच्या घरी असताना आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांचे सहकारी सुखलाल मीना, झाबरलाल मीना, सरदारमल मीना असे सर्वांना तुम्ही सीताराम मीना यांना घरात का घेतले असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. फौजदार व्यंकट पोटे तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10177 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top