
सांगवीत मुलांसाठी समूह नृत्य स्पर्धा
जुनी सांगवी, ता. १८ ः सांगवी परिसर माहेश्वरी समाज व सांगवी परिसर महेश मंडळातर्फे समाज उत्पत्ती दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस, एकल, युगल नृत्य व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांनी विविध सामाजिक विषयावर संदेश देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या वेशभूषा सादर केल्या. महिलांनी समूह नृत्याद्वारे राजस्थानी संस्कृतीचे सादरीकरण केले. कार्यक्रमास शारदा सोनावणे, सुनील लोहिया, सतीश लोहिया, नीलेश अट्टल, पंकज पंपालिया आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोज अटल, डिम्पल हेडा यांनी केले. परीक्षक म्हणून विक्रांत देव्हारे, मयूरी काबरा यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन दीपेश मालाणी, गणेश चरखा, गजानंद बिहाणी, पंकज टावरी यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10181 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..