खंडणी मागणाऱ्या सराईतावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणी मागणाऱ्या सराईतावर गुन्हा
खंडणी मागणाऱ्या सराईतावर गुन्हा

खंडणी मागणाऱ्या सराईतावर गुन्हा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : फळ विक्रेत्याला वीस हजार रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार थेरगावातील शिवतीर्थनगर येथे घडला.

सनी उर्फ नितीन राकेश सौदाई (वय ३०, रा. सुभाषनगर, पिंपरी) असे गुन्हा
दाखल केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण कृष्णदेव शेरखाने (वय ३४, रा. सुंदर कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सनी हा सराईत गुन्हेगार असून सध्या पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यात तसेच मोका अंतर्गत येरवडा कारागृहात आहे. फिर्यादी यांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. ३ मे रोजी सनीने शेरखाने यांना फळ विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी २० हजार रूपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पुण्यातील विशेष सत्र न्यायालय (मोका) यांच्या आदेशानुसार, सौदाई याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10192 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top