प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा गळा आवळून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमात अडसर ठरणाऱ्या 
पत्नीचा गळा आवळून खून
प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा गळा आवळून खून

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा गळा आवळून खून

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून खून केला. ही घटना वाकड येथे घडली. कीर्ती आशिष भोसले (१९, रा. सावतामाळी मंदिराजवळ, भुजबळ वस्ती, वाकड) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी कीर्ती यांचा पती आशिष भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आशिष व कीर्ती हे दोघेही वाकड येथे राहत होते. दरम्यान, आशिष याचे त्याच्या ऑफिसमधील महिलेशी प्रेम संबंध होते. त्यांच्या प्रेमात कीर्ती अडसर ठरत होती. यामुळे प्रेम संबंधातील अडसर काढण्याचे आशिषने ठरवले. त्यानुसार कीर्ती यांचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देवून मारहाण केली. तसेच बुधवारी (ता. २२) सायंकाळी चारच्या सुमारास राहत्या घरात पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आशिष घराला कुलूप लावून पसार झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाचे अपहरण करीत बेदम मारहाण केली. हा प्रकार वाकड येथे घडला. मनोहर ऊर्फ सोन्या वर्सेत वेताळ (वय ३०, रा. शिवशंकर हाउसिंग सोसायटी मोरे वस्ती , चिखली) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्यादी आहे. त्यानुसार पोलिसांनी एकाला अटक केल्या असून एकावर गुन्हा दाखल आहे. आरोपींची एकाच्या पत्नीशी फिर्यादीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपींनी फिर्यादीच्या मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर लाथा बुक घेणे लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लोखंडी प्लेटमध्ये दबल्याने कामगाराचा मृत्यू
कंपनीत क्रेनने लोखंडी प्लेट उचलून दुसरीकडे नेत असताना प्लेटचा धक्का लागून त्यामध्ये दबल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना भोसरी एमआयडीसीत घडली. व्यंकट हाक्के असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे भाऊ दिगंबर शंकर हाक्के यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार क्रेन चालक मुकेश प्रसाद (वय २८, रा. मोरे वस्ती, चिखली) याला पोलिसांनी अटक केली असून कंपनीचा मालक बेळयानीसिद्ध नेहरु कमळे याच्यावर गुन्हा दाखल आहे. व्यंकट हाक्के हे भोसरी एमआयडीसीतील सेक्टर क्रमांक दहा येथील तुळजाभवानी रोलिंग अँड प्रेसिंग या कंपनीत कामाला होते. दरम्यान, मुकेश प्रसाद हा क्रेनच्या साहाय्याने लोखंडी प्लेट उचलून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना व्यंकट यांना प्लेटचा धक्का लागला. त्यानंतर ते भिंत व प्लेटमध्ये दबल्याने त्यांचा मृत्यू झाला. व्यंकट यांना सुरक्षिततेची कोणतीही साधने न पुरविल्याने तसेच त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरनी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल झाला आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सोने, चांदीच्या दागिन्यांचा अपहार
सोने, चांदीच्या दागिन्यांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही नवी सांगवी येथे घडली. याप्रकरणी अमित शेट्टी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर शकील शहाबुद्दीन शेख यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने नवी सांगवीतील चौकातील फिर्यादीच्या ज्वेलर्स दुकानातून तसेच त्यांचे मित्र अशोक कोळेकर यांच्या दुकानतूनही सोने व चांदीचे दागिने असा एकूण ३१ लाख ९२ हजार ४२०रुपये किमतीचे दागिने घेऊन गेले. त्याबदल्यात २४ कॅरेट सोने व चोख चांदी देतो असे सांगितले. मात्र, नंतर नेलेल्या दागिन्याचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10196 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..