गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

इंजिनिअरकडे मागितली दहा लाखांची खंडणी
पिंपरी, ता. २३ : फोनवरून जिवे मारण्याची धमकी देत चिंचवडमध्ये दहा लाखांची खंडणी मगितल्याप्रकरणी एका अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. संतोष दत्तात्रेय सुवर्णकार (रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. ते चिंचवड एमआयडीसीमध्ये सहाय्यक अभियंता आहेत. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास ऑफिसमध्ये असताना त्यांना फोन आला. त्यावर समोरील व्यक्तीने ''उगवता सूर्य जर पाहायचा असेल तर दहा लाख रुपये कॅश उद्या रेडी ठेव, नाहीतर तुझ्या आयुष्याला फुलस्टॉप लावून टाकतो कायमचा'' अशी धमकी दिली. या प्रकरणी एकावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------
देहूरोडमध्ये विनयभंग; वृद्धाला अटक
पिंपरी, ता. २३ : पादचारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी देहूरोड येथील वृद्धाला पोलिसांनी अटक केली. राजेश केदारनाथ जयस्वाल (वय ६४, रा. देहूरोड) असे त्याचे नाव आहे. फिर्यादी महिला रस्त्याने जात असताना किवळे येथील एका हॉटेलसमोर असलेल्या आरोपीने त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. तसेच अश्लील भाषेत बोलून त्यांचा मोबाईल नंबर मागितला, अशी तक्रार देहूरोड पोलिस ठाण्यात दिली.
------------------------
भोसरीत वेश्याव्यवसाय प्रकरणी अटक
पिंपरी, ता. २३ : महिलांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी एका महिलेला अटक केली. ही कारवाई भोसरी येथे करण्यात आली. तिने दोन महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. याबाबत माहिती मिळाली असता पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने दिघी-भोसरी रस्त्यावरील राजरत्न लॉज येथे छापा टाकला. या कारवाईत दोघींची सुटका करून दलाल महिलेला पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून रोकड, मोबाईल व इतर साहित्य असा ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
------------------------
दिघीत पावणेसहा लाखांच्या बकऱ्या चोरीला
पिंपरी, ता. २३ : दिघी येथील शेळी पालन केंद्रामधून विविध जातीच्या पावणेसहा लाखांच्या बकऱ्या चोरल्या. ही घटना दिघी येथे घडली. याप्रकरणी रवींद्र साहेबराव वाळके (वय ४८, रा. आळंदी रोड, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराजवळच्या त्यांच्या केंद्रात शुक्रवारी (ता. २२) पहाटे सव्वाचारच्या सुमारास लाल रंगाच्या मोटारीमधून तीन चोरटे आले. कुलूप तोडून जाळी उचकटून आत शिरत साऊथ आफ्रिकन बोर, पंजाब बीटेल व बोर क्रॉस जातीच्या ५ लाख ८० हजारांच्या पाच बकऱ्या मोटारीत घालून चोरून नेल्या. ------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10198 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top