
विद्युत रोहित्रांजवळ संरक्षक जाळ्या बसवाव्यात
जुनी सांगवी, ता. २६ ः सांगवी, पिंपळे गुरव व शहर परिसरातील खुल्या विद्युत रोहित्रांभोवती वाढलेले गवत, झाडे वेलींची स्वच्छता करून रोहित्राभोवती सुरक्षारक्षक जाळ्या बसवण्यात याव्यात, अशी मागणी ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने पिंपरी महावितरण कार्यकारी अभियंता दत्तात्रेय साळी यांच्याकडे करण्यात आली आहे. या बाबत तशा आशयाचे महावितरणला निवेदन देण्यात आले आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी रोहित्राभोवती तुटलेल्या संरक्षक जाळ्या, अथवा खुली रोहित्रांपासून अपघाताचा धोका आहे. वाढलेले गवत झाडे झुडपे वेली वाढून पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा रोहित्र झाकली जातात. अनेक रोहित्र रस्त्याकडेला आहेत. लहान मुले, पादचारी, भटकी जनावरे यांना उघड्या रोहित्रांमुळे धोका संभवतो. नवी सांगवी येथे एचडीएफसी बॅंक चौकात रोहित्राला लागूनच पदपथावर स्मार्ट सिटीच्या कामातून ओपन जिमचे साहित्य बसविण्यात आले आहे. उद्देश चांगला असला तरी अशा ठिकाणी अनेकदा शॉर्टसर्किट होणे, रोहित्राला आगीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पुरेशी सुरक्षा उपाययोजना करून काळजी घ्यायला हवी. पदपथावर लावण्यात आलेले ओपन जीम व्यायामाचे साहित्य व जवळच असलेले विद्युत रोहित्र यामुळे येथे धोका संभवतो. अशा सर्व धोक्याच्या ठिकाणी पुरेशी उपाय योजना करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर कैलास बनसोडे, बबिता राजपूत, सुरेखा काजरोळकर, आदींच्या सह्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10205 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..