मर्डर करण्याची धमकी देत कंपाउंड टाकल्याप्रकरणी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मर्डर करण्याची धमकी देत 
कंपाउंड टाकल्याप्रकरणी गुन्हा
मर्डर करण्याची धमकी देत कंपाउंड टाकल्याप्रकरणी गुन्हा

मर्डर करण्याची धमकी देत कंपाउंड टाकल्याप्रकरणी गुन्हा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ : शेत जमिनीवर तार कंपाउंड करून अतिक्रमण केले. त्यास हरकत घेतली असता ‘तुम्ही पुढे याल, तर मर्डर करीन’ अशी धमकी दिली. या प्रकरणी ५२ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार देहूगाव येथे घडला. अनिल मारुती घोगरे, आकाश अनिल घोगरे व इतर ५० गुंड प्रवृत्तीच्या मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अशोक शंकर चव्हाण (रा. चव्हाण नगर, देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अनिल व आकाश हे गुंड प्रवृत्तीच्या मुलांना आणून देहूतील फिर्यादी यांच्या शेतात तार कंपाउंड टाकत होते. दरम्यान, फिर्यादी यांनी हरकत घेतली असता आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या भावाला शिवीगाळ व दमदाटी केली. अनिल याने फिर्यादीला ‘तुम्ही आम्हाला ओळखले नाही, आम्ही तार कंपाउंड करणारच , पुढे याल तर मर्डर करीन’, अशी धमकी दिली. आरोपी अनिल व आकाश यांनी यापूर्वी २०१५-१६ मध्येही आशा प्रकारे वर्तन केले होते. या बाबत तक्रार दाखल केली होती. आरोपींपासून जिवाला धोका असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10214 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..