भोसरीत अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीत अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार
भोसरीत अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

भोसरीत अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ : अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून परिसरात दहशत मजवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भोसरी येथे घडली. आदित्य बंडू फरताडे (वय १७, रा. बालाजी नगर) असे मुलाचे नाव आहे. फारुक ऊर्फ फाऱ्या शेख (वय २४, रा. भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ‘मी बालाजी नगरचा भाई आहे’ असे म्हणत फिर्यादीला ‘तुला मारूनच टाकतो’ अशी धमकी दिली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केले. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

थेरगावात एकाला चाकूने भोसकले
ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाला चाकूने भोसकल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना थेरगाव येथे घडली. नीलेश राजीवडे (वय ३३, रा. हिंजवडी) असे अटक केलेल्याचे आहे. ओंकार सुरेश सुतार यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे वडील थेरगावातील प्रसूनधाम सोसायटी समोरील रस्त्याने जात असताना ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून आरोपीशी वाद झाला. त्यांना शिवीगाळ, मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या वडिलांच्या पोटात चाकूने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

सोनसाखळी हिसकावली
तूप विकण्याच्या बहाण्याने आलेल्या एकाने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. नवी सांगवी ही घटना घडली. विनायकनगरमध्ये राहणाऱ्या सत्तर वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. दोन अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. तूप विकण्याच्या बहाण्याने आलेल्याने ‘तुमच्या गळ्यातील सोनसाखळी दाखवा, मला माझ्या आईला सोनसाखळी बनवायची आहे’ असे तो म्हणाला. दरम्यान, फिर्यादींनी सोनसाखळी दाखवली असता चोरट्याने ती हिसकावली. फिर्यादीने त्याचा पाठलाग केला. मात्र, तो दुसऱ्या दुचाकीवर बसून पसार झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10218 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top