गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

आकुर्डीत तरुणावर प्राणघातक हल्ला

पिंपरी, ता. ४ : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर हत्याराने प्राणघातक हल्ला केला. ही घटना आकुर्डी येथे घडली. गोपाळ अंकुश हाळनूर (वय २७, रा. घरकुल, चिखली) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजन आलबु शहा (वय २१, रा. दत्तवाडी, आकुर्डी) व मोम्या ऊर्फ शहाबाज रशीद मोमीन (वय २२, रा. गंगानगर, आकुर्डी) यांना अटक केली आहे. फिर्यादी हे त्यांचा मित्र अनिकेत कदम याच्याशी बोलत असताना आरोपी राजन हा मध्येच बोलू लागला. यावरून फिर्यादी व राजन यांच्यात वाद झाला. या वादाच्या कारणावरून काही वेळाने राजन याने फिर्यादीला शिवीगाळ करून ''तुला आज सोडत नाही'' असे म्हणत फिर्यादीवर धारदार हत्याराने वार केले. तर आरोपी मोमीन याने फिर्यादीला मारण्यासाठी पेव्हिंग ब्लॉक उचलला. हा प्रकार आकुर्डी येथे घडला. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सूस येथे टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण
पाच जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केल्याची सुस येथे घडली. या प्रकरणी आकाश सुनील पगारे (रा. धनुकडे वस्ती, बाणेर, मूळ-जालना) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भागवत हावळे (वय २२, रा. सुसगाव) याच्यासह त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे कामात असताना भागवत याने त्यांना फोन करून बोलावून घेतले. भागवतचे चार साथीदारही तेथे होते. दरम्यान, आरोपींपैकी एकाची नातेवाईक व फिर्यादी हे संपर्कात असल्याच्या संशयावरून भागवत याने फिर्यादी व त्यांचा मित्र करण गायके यांना शिवीगाळ करून हाताने व दांडक्याने मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

थेरगावात पावणे सहा लाखांची घरफोडी
खिडकीचे गज तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने पावणे सहा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना थेरगाव येथे घडली. या प्रकरणी अजित महादेव कदम (रा. थेरगाव, मूळ-जालना ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीच्या घराच्या खिडकीचे गज तोडून , वाकवून चोरटा आत शिरला. घरातील साडे तीन लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख ८८ हजार ७७५ रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ऑनलाइन नेटबँकिंगद्वारे पावणे चार लाखांची फसवणूक
ऑनलाइन नेटबँकिंगद्वारे पावणे चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अमरेंद्र मुरलीधर कुलकर्णी (रा. शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण माथूर व एका अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल आहे. बावधन येथे बंधन बँकेची इंटरव्यूव घेण्याच्या बहाण्याने आरोपी माथूर याने त्याच्या दुसऱ्या अज्ञात आरोपीसोबत फिर्यादी यांना पाठवले. त्यावेळी तो अज्ञात आरोपी फिर्यादीचा मोबाईल घेऊन गेला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलवरून ऑनलाइन नेट बँकिंगद्वारे तीन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करून या रकमेचा अपहार केला. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10236 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..