कृष्णा चौकात कामांना गती द्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्णा चौकात कामांना गती द्या!
कृष्णा चौकात कामांना गती द्या!

कृष्णा चौकात कामांना गती द्या!

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. ६ ः नवी सांगवीतील कृष्णा चौकात सेवा वाहिन्या, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत असून येथील काम गतीने करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे कृष्णा चौकाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. हे पाणी थेट रहिवाशांच्या घरात घुसल्याने भर पावसात रहिवाशांना रस्त्यावर येण्याची वेळ आली होती. मूळात पावसाळी गटारांची कामे पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित असते. मात्र, पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या अनास्थेमुळे पावसाळी गटाराची कामे झाली नाहीत. मात्र, आता भर पावसाळ्यात या चौकातील गटाराचे काम हाती घेण्यात आले आहे. याचा फटका वाहनचालक व पादचारी व नागरिकांना बसत आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली असून पालिका आयुक्तांनी यात लक्ष घालून काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी, ठेकेदारांना द्याव्यात, असे राजेंद्र जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.

नागरिकांची गैरसोय
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा चौकातील पाण्याचा निचरा न झाल्याने चौकाला तलावाचे स्वरूप आले होते. पाणी तुंबल्याने परिसरातील दुकाने, घरांमधून पाणी शिरले होते. या परिस्थितीनंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने पावसाळी गटाराचे काम हाती घेतले. मात्र, संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे नागरिक, तसेच वाहनचालक वैतागले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेता येथील काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10244 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..