अंगावर झाड पडल्याने दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगावर झाड पडल्याने दोघांचा मृत्यू
अंगावर झाड पडल्याने दोघांचा मृत्यू

अंगावर झाड पडल्याने दोघांचा मृत्यू

sakal_logo
By

अंगावर झाड पडल्याने
भोसरीत दोघांचा मृत्यू

पिंपरी, ता. ६ : दुचाकीवरून जात असताना झाड अंगावर पडल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना पुणे - नाशिक महामार्गावर भोसरी पोलिस ठाण्यासमोर घडली.
समाधान नाथू पाटील (वय ३५, रा. होलेवाडी, ता. खेड), रमेश निलेश शिंगाले (वय ३६, रा. अमरावती) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. समाधान व रमेश हे शनिवारी (ता. ६) सकाळी दुचाकीवरून कामाला जात होते. नाशिक फाट्याच्या दिशेने जात असताना सकाळी सहाच्या सुमारास भोसरी पोलिस ठाण्यासमोरील झाड त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी त्यांना तातडीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोघांनीही हेल्मेट परिधान केले होते. मात्र, झाड मोठे असल्याने दोघे गंभीर जखमी झाले.
झाड पडल्यामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड बाजूला घेतल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10247 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..