दहीहंडीच्या वर्गणीसाठी टोळीचा रहाटणीत राडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहीहंडीच्या वर्गणीसाठी टोळीचा रहाटणीत राडा
दहीहंडीच्या वर्गणीसाठी टोळीचा रहाटणीत राडा

दहीहंडीच्या वर्गणीसाठी टोळीचा रहाटणीत राडा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : दहीहंडीसाठी कमी वर्गणी दिल्याच्या रागातून अकरा जणांच्या टोळीने दुकान चालकाला बेदम मारहाण करत गल्ल्यातील रोकड लुटली. पुढच्या महिन्यापासून हप्ता चालू कर नाहीतर तुझ्या आई-वडीलांना मारून टाकू, अशी धमकी देत टोळक्याने दहशत माजवली. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. हा प्रकार रहाटणीतील जय भवानी चौक येथे घडला.

याप्रकरणी राहुल अरविंद गुप्ता (वय २७, रा. जयभवानी चौक, रहाटणी लिंक रोड, रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद सुभाष राऊत (वय २४), मनीष मच्छिंद्रनाथ कदम (१८), ज्ञानेश्वर उर्फ माऊली दामोदर उपल्ले (२१, सर्व रा. श्रीनगर, रहटणी), यश सतीश रसाळ (२०, रा. तापकीर नगर, काळेवाडी) यांना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच सुनील शेट्टी व विजय तलवार हे फरारी आहेत.

फिर्यादी यांचे रहाटणी येथील राज स्नॅक्स अँड स्वीट सेंटर असून येथे आलेले आरोपी दहीहंडीची वर्गणी मागू लागले. त्यासाठी त्यांनी फिर्यादी यांचा भाऊ विवेक याने शंभर रुपये दिले. मात्र, याला नकार देऊन शेट्टी याने विवेक यांच्या कानाखाली मारत पाचशे रुपयांची वर्गणी मागितली. यावर विवेक यांनी दोनशे रुपये दिले. याचा राग आल्याने आरोपी शेट्टी व तलवारे यांनी विवेक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर इतर आरोपींनी दुकानात शिरून फिर्यादी व त्यांच्या भावांना मारहाण सुरू केली. दुकानातील काऊंटर खाली पाडले, काचा फोडल्या. ‘तुम्हाला माहीत नाही का? आम्ही या एरियाचे भाई आहोत’, असे म्हणत लोखंडी कढई फिर्यादीच्या डोक्यात मारली. दरम्यान, भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या आई-वडिलांनाही मारहाण केली. गल्ल्यातील १० ते १२ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले, असे फिर्यादित म्हटले आहे
-------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10260 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..